
ॲक्सिस फायनान्सकडून खास ‘व्यापार बिझनेस लोन’
भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांपैकी एक असलेल्या ॲक्सिस फायनान्स लिमिटेडने (एएफएल) आज ‘ॲक्सिस फायनान्स व्यापार बिझनेस लोन’ सुरू करण्याची घोषणा केली. हे एक तारण-मुक्त कर्ज समाधान आहे, जे भारतातील निम-शहरी आणि ग्रामीण भागांतील सूक्ष्म आणि लहान व्यवसायांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आले आहे.
या व्यापार बिझनेस लोनचा उद्देश किरकोळ विक्री, सेवा आणि व्यापार क्षेत्रातील सूक्ष्म तसेच लहान उद्योजकांना 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज, सोईस्कर कालावधी आणि कोणत्याही तारणाची आवश्यकता नसलेल्या सुविधा देऊन सक्षम करणे हा आहे. खेळते भांडवल, व्यवसायाचा विस्तार किंवा उपकरणांच्या आधुनिकीकरणासाठी या लोनमुळे एक सोयीस्कर आर्थिक उपाय मिळतो. किमान कागदपत्रे आणि सुलभ प्रक्रियेमुळे, भारतातील स्वयंरोजगार समुदायाला जलद आणि त्रासमुक्त कर्ज मिळण्याची खात्री देते.
या लाँचप्रसंगी ॲक्सिस फायनान्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी साई गिरीधर म्हणाले, “सूक्ष्म आणि लघु उद्योजक हे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. ‘व्यापार बिझनेस लोन‘च्या माध्यमातून, देशभरातील दुकानदार, व्यापारी आणि सेवा पुरवणाऱ्यांना तारण-मुक्त वित्तपुरवठा करून, आम्ही औपचारिक कर्जाला अधिक सर्वसमावेशक बनवण्याचे ध्येय ठेवले आहे. हे कर्ज लहान व्यवसाय मालकांना आत्मविश्वासाने आणि कार्यक्षमतेने आपल्या कामकाजाचा विस्तार करण्यासाठी, खेळते भांडवल सुधारण्यासाठी आणि वाढीच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सक्षम करते.”
ते पुढे म्हणाले, “जलद सेवा आणि उत्कृष्ट ग्राहक-अनुकूल अनुभव देण्यासाठी तंत्रज्ञान आणि डेटा-आधारित अंडररायटिंगचा लाभ घेण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. भारताच्या स्वयंरोजगारी समुदायाला सोप्या, सुरक्षित आणि विस्तारण्यायोग्य कर्ज उपायांसह सक्षम करण्याच्या आमच्या प्रवासातील ‘व्यापार बिझनेस लोन‘ हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.”
या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक (EWS) आणि कमी उत्पन्न गट (LIG) या विभागांसाठी गृहकर्ज अधिक सुलभ करण्यासाठी ॲक्सिस फायनान्सने ‘दिशा होम लोन्स’ सादर केले, आणि सूक्ष्म-उद्योजक, व्यापारी तसेच स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींसाठी ‘ॲक्सिस फायनान्स शक्ती’ हा सूक्ष्म मालमत्ता तारण कर्ज (मायक्रो एलएपी) पर्याय देखील उपलब्ध करून दिला. या उपक्रमांना पुढे नेत, ‘व्यापार बिझनेस लोन’ हे सर्वसमावेशक कर्जपुरवठ्यासाठी ॲक्सिस फायनान्स लिमिटेडची वचनबद्धता आणखी मजबूत करते, ज्यामुळे स्थानिक उद्योगांना त्यांच्या कामाचा विस्तार करण्यास तसेच आर्थिक प्रगती साधण्यास मदत होते.
सुरक्षित आणि असुरक्षित कर्जपुरवठा या दोन्ही क्षेत्रांमध्ये ॲक्सिस फायनान्सचे भक्कम स्थान आहे. त्याला भक्कम कार्यप्रणाली, प्रगत तंत्रज्ञान, सक्षम अंडररायटिंग क्षमता आणि उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये ग्राहकांना उत्तम अनुभव देण्यावर लक्ष केंद्रित करणारे विस्तृत वितरण नेटवर्क यांचा आधार आहे.

