
सातारा
अगा ,कास ‘फुले’ची ना…!
सातारा (प्रतिनिधी) :
कास पठार हे २०१२ साली युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत कास पठाराचा समावेश केला गेला , यानंतर कास पठारावर शेकडो प्रकारची फुले पाहण्यासाठी देश विदेशातील लाखो पर्यटक येऊ लागल्याने कास पठार संरक्षीत करण्यासाठी कंपाऊंड टाकण्यात आले यामुळे निसर्ग चक्रातील बदलामुळे व परिसरातील वाढती वृक्ष तोड आणि वाढत्या सिमेंटच्या जगंलामुळे कास पठारावरील फुलांवर परिणाम होत असल्याने,कास पठारावरील फुलांचा बहर कमी कमी होत चालल्याने या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना कास पठारावरील फूले म्हणतायेत मी नाय येत जा …अशी अवस्था झाल्याचे चित्र दिसत आहे.
यामुळे जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कास पठारावर जिल्हा प्रशासनाने वेळीच लक्ष घालण्याची गरज आहे. कास पठारावरील फुलांचा हंगाम सुरू झाला मात्र म्हणावी अशी फुले न आल्याने पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर उमटतोय , फुले न आल्याने पर्यटकांमध्ये आणि वन समिती च्या लोकांमध्ये किरकोळ शाब्दिक वादावादी चे प्रसंग उद्भवत आहेत . तर कास पठारावरील टाकण्यात आलेल्या कंपाऊंड मुळं कास फुलांवर परिणाम झाल्याची चर्चा सर्वच स्तरातून होऊ लागल्याने सातारचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी देखील आपल्या पाहणी दौऱ्यात अनेक तक्रारी असल्याचे सांगितले.
यामुळे कास पठारावरील कंपाऊंड चा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आल्यामुळे जिल्हाधिकारी नेमके काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे ….
कास पठारावरील फुलांचा हंगाम हा मागिल वर्षा पेक्षा यावर्षी बरा असून , कुमुदिनी तलाव परिसरात फुलं फुलू लागली असून शनिवारी १७८४ पर्यटकांनी कास पठारावर हजेरी लावली असल्याची माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे .
कास परिसरातील प्रदुषण रोखण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात येणार आहेच, परंतु परिसरात सुरू असलेलं उत्खनन , वाढती वृक्षतोड, बेकायदेशीर बांधकामे याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष घालावं अशी मागणी पर्यावरण प्रेमी करत आहेत .