google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजीदेश/जग

मालदीवला देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीत मोठी कपात!

Budget 2024: केंद्रातील मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प गुरुवारी सादर करण्यात आला. मात्र, हा सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प होता. एकीकडे या अर्थसंकल्पात लक्षद्वीपबाबत मोठी घोषणा करण्यात आली. त्याचवेळी मालदीवला देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीत मोठी कपात करण्यात आली.

भारत सरकारने 2024-2025 च्या अर्थसंकल्पात मालदीवला दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीत 22 टक्के कपात करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. भारत सरकारने मालदीवच्या विकासकामांसाठी 600 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मालदीवला कोणत्याही सरकारने दिलेल्या आर्थिक मदतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. खरेतर, 2023-2024 मध्ये भारताने मालदीवला 770.90 कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली. हे 2022-2023 मध्ये मालदीवला दिलेल्या 183.16 कोटी रुपयांपेक्षा 300 टक्क्यांनी जास्त आहे.

दरम्यान, 2023 च्या बजेटमध्ये सरकारने सुरुवातीला 400 कोटी रुपयांची तरतूद मालदीवसाठी केली होती. मात्र नंतर त्यात सुधारणा करुन 770.90 कोटी रुपये करण्यात आले. एकप्रकारे भारत गेल्या काही वर्षांपासून मालदीवचा प्रमुख भागीदार आहे. भारताने मालदीवमध्ये संरक्षण, शिक्षण, आरोग्यसेवा आणि पायाभूत सुविधा अशा अनेक क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. इतर अनेक देशांना देण्यात येणारी आर्थिक मदतही कमी केली आहे. मात्र, केवळ मालदीवच नाही तर सरकारने इतर अनेक देशांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीमध्ये 10 टक्क्यांनी कपात केली आहे.

दुसरीकडे, भारताने 2024-2025 साठी परदेशातील मदतीसाठी 4883.56 कोटी रुपये राखून ठेवले आहेत. त्याचवेळी, मालदीवसोबत सुरु असलेल्या तणावादरम्यान, भारत सरकारने 2024 च्या अंतरिम अर्थसंकल्पात लक्षद्वीपबाबत मोठी घोषणा केली. गुरुवारी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाले की, केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर सरकार पूर्ण भर देईल. याशिवाय, सरकार देशभरातील पर्यटन क्षेत्रात लक्षणीय गुंतवणूक करणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!