‘चांदोर मधून जाणारा राज्य महामार्ग 8 आता झाला प्रमुख जिल्हा रस्ता’
मडगाव:
चांदर गावातून जाणारा राज्य महामार्ग 8 हा प्रमुख जिल्हा रस्ता 54 म्हणून बदलण्यासाठी गोवा सरकारने अधिसूचना जारी केली आहे. 18 जानेवारी 2023 रोजी गोवा विधानसभेत शून्य प्रहरात सदर मुद्दयावर सरकारचे लक्ष वेधले होते त्याची दखल घेवून सदर अधिसूचना जारी केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांचे आभार मी मानतो. चांदर -गिरदोली-माकाझान येथील लोकांची सेवा करण्यासाठी आणि त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे विरोधी पक्षनेते आणि कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
या अधिसूचनेमुळे वारसा स्थळ असलेल्या चांदरच्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळेल. भरधाव जाणाऱ्या अवजड वाहनांमूळे लोकांनी त्रास सहन करावा लागत होता. गावातील वारसा घरांच्या नुकसानीच्या आव्हानांनाही लोकांना तोंड द्यावे लागले, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.
Thank you PWD Minister Bab @nileshcabral for acknowledging my Zero Hour Mention of 18.01.2023 & issuing Notification to change State Highway 8 passing through Chandor Village as Major District Road 54. My commitment to People of Chandor-Guirdolim-Macazana stands fulfilled. pic.twitter.com/AYZu6TXb0D
— Yuri Alemao (@Yurialemao9) February 14, 2023
अवजड वाहनांची हालचाल; विशेषत: चांदर गावातून जाणारे ट्रकही थांबवण्याची गरज आहे. वाहनांची गती नियंत्रीत करण्यासाठी चांदरच्या लोकांनी रस्त्याच्या कडेला फलक लावले होते मात्र काही समाजकंटकांनी ते काढून टाकले. मी पोलीस अधिकार्यांकडे बोलून अवजड वाहतुकीच्या हालचालींवर निर्बंध घालण्याची मागणी केली आहे. सार्वजनीक बांधकाम खात्याने आता रस्त्यावर आवश्यक फलकही उभारावेत, अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली.
कुंकळ्ळी मतदारसंघात विविध रस्त्यांच्या हॉटमिक्सिंगचे काम सुरू झाले आहे. मी माझ्या मतदारसंघातील काही वॉर्डांमध्ये वीज वितरणासाठी ट्रान्सफॉर्मरही सुरू केले आहेत. टप्प्याटप्प्याने कुंकळ्ळीचा विकास लोकांना दिसेल, अशी माहिती युरी आलेमाव यांनी दिली.