“काँग्रेस पुढच्या १० वर्षांतही १०० चा आकडा पार करू शकणार नाही”
“पुढच्या १० वर्षांनीही काँग्रेस १०० चा आकडा पार करू शकणार नाही. २०१४, २०१९ आणि २०२४ या तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसला जितक्या जागा मिळाल्या त्या सर्व जागा आम्हाला या एका निवडणुकीत मिळाल्या आहेत. इंडिया आघाडी पूर्वी हळूहळू बुडत होते. पण आता आणि मी स्वच्छपणे पाहू शकतो की इंडिया वाल्यांना अंदाज नाहीय की हळूहळू ते बुडत होते, आणि तेजीने ते गर्तमध्ये जाणार आहेत”, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली. एनडीएच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांची आज दिल्लीत बैठक होत आहे. या बैठकीला काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीवर तुफान प्रहार केले.
“इंडिया आघाडी देशातील सामान्य नागरिकांच्या भावना समजू शकले नाहीत. भारताच्या सामान्य लोकांच्या व्यक्तीचीही काही मतं आहेत. जे नेते जमिनीशी जोडलेले असतात त्यांनाच सामान्य नागरिकांच्या भावना समजू शकतात. पण ते तिथे कमी पडले. मी आशा करतो की ते लोकशाहीचा सन्मान करतील. पंरतु, त्यांच्या व्यवहारामुळे वाटतं की कदाचित त्यांच्यात ही क्षमता येण्याची वाट पाहावी लागेल”, असंही ते पुढे म्हणाले.
“आपल्या पक्षाच्या पंतप्रधानाला हे किंमत देत नाहीत. त्यांचे अध्यादेश फाडतात. यांच्या नेत्यांना परदेशातील कार्यक्रमात खुर्ची नसायची. लोकशाही आपल्याला सर्वांचा आदर करायला शिकवते. विरोधी पक्षातही जे खासदार जिंकून आले आहेत, मी त्यांचंही अभिनंदन करतो. गेल्या १० वर्षांपासून मला एका गोष्टीची उणीव जाणवत होती. सखोल चर्चा, उत्तम वाद-विवाद या गोष्टींची उणीव भास होती, या नव्या खासदारांच्या निमित्ताने ही उणीव कमी भासेल अशी आशा व्यक्त करतो.
देशाने असाही काळ पाहिला की सरकार आणि जनता यांच्यात एक अदृश्य दरी होती. मात्र एनडीएच्या दहा वर्षांच्या काळात ही दरी आपण मिटवली. येणाऱ्या दहा वर्षांच्या काळात मी अत्यंत जबाबदारीने बोलतो आहे. येणाऱ्या दहा वर्षांमध्ये गुड गव्हर्नन्स, विकास, लोकांचं आयुष्यमानाचा दर्जा वाढवणं यावर काम करणार आहोत. तसंच मला हे वाटतं मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय यांच्या आयुष्यात सरकारचा हस्तक्षेप जितका कमी होईल तितकी लोकशाही मजबूत होईल असंही मोदींनी यावेळी म्हटलं आहे.