लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमधून क्रिकेटला डच्चू
लॉस एंजेलिस:
२०२८ मध्ये होणार्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) या प्रकरणाची माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) दिली आहे. या बाबतीत आयसीसीही असहाय दिसली आहे.
रिपोर्टनुसार, आयसीसीने क्रिकेटबाबत ऑलिम्पिकची तयारी सुरू केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्ड आता नवीन ऑलिम्पिक समिती स्थापन करण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह या समितीचे नेतृत्व करताना दिसणार आहेत. जय शाह सध्या आयसीसीमध्ये बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करतात.
२०२८ मध्ये होणाऱ्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण २८ खेळांचा समावेश करण्यात येणार आहे. यामध्ये क्रिकेटला स्थान मिळालेले नाही. पण २०२८ नंतर पुढील ऑलिम्पिक २०२३२ मध्ये ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे होणार असल्याची पुष्टी झाली आहे. यामध्ये क्रिकेटचा समावेश होऊ शकतो.
ऑलिम्पिक स्पर्धा सर्वात प्रथम १८९६ मध्ये अथेन्स येथे आयोजित करण्यात आले होती. पण त्यानंतर संघ न मिळाल्याने क्रिकेटचा समावेश करण्यात आला नाही. चार वर्षांनंतर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला, ज्यामध्ये दोन संघांचा सहभाग होता. हे संघ फ्रान्स आणि इंग्लंड होते. त्यांच्यामध्ये फक्त एकच अंतिम सामना झाला, ज्यात इंग्लंडने बाजी मारली.
हा सामना फक्त दोन दिवस चालला आणि निकाल लागला. या सामन्यात दोन्ही संघातून १२-१२ खेळाडू खेळले. सामना जिंकल्यानंतर, विजेत्या ग्रेट ब्रिटनला रौप्य पदक आणि उपविजेत्या फ्रान्सला कांस्य पदक देण्यात आले. पण ऑलिम्पिकमध्ये १२ वर्षांनंतर या सामन्याची नोंद झाली. यानंतर इंग्लंडला सुवर्ण आणि फ्रान्सला रौप्य पदक देण्यात आले.