वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तडजोडीने अतिक्रमणे फोफावली?
महाबळेश्वर :
महाबळेश्वर येथील स्केटस पॉईंट परिसरात वनविभागाने व्यवसायासाठी एकच परवानगी दिली असताना देखील याठिकाणी बेकायदेशीर स्टॉल उभे राहिले आहेत , या संदर्भात अनेकदा तक्रार झाल्यावर वन विभागाने कारवाई केल्या , मात्र त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण करत परिसरात संबंधित स्टॉल धारकांना हताशी धरून वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी हे तडजोडी करुन याठिकाणी अतिक्रमण करणार्या बेकायदेशीर स्टॉल धारकांना पाठिशी घालत तर नाहीत ना ? म्हणूनच याठिकाणी अतिक्रमणे फोफावली नाहीत ना ? अशी चर्चा पर्यावरणप्रेमी मध्ये आहे.
स्केट्स पॉईंट येथे पार्किंग साठी जागा कमी असून गर्दीच्या वेळी याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना या अनाधिकृत स्टॉल व टपर्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते , बर्याच वेळा वादावादी चे प्रसंग देखील उद्भवतात , यामुळे वनविभागाने वेळीच लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी पर्यटक करत आहेत .