google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

जनरेशन एक्सचा डिलिव्हरीसाठी शेजाऱ्यांवर भर…

गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपचा एक भाग असलेल्या गोदरेज आणि बाइसच्या लॉक्स अँड आर्किटेक्चरल फिटिंग्ज बिझनेसने अलीकडेच ‘लिव्ह सेफ, लिव्ह फ्रीली’ सर्वेक्षण केले. यामध्ये डिलिव्हरी हाताळणीच्या संदर्भात पिढीच्या वर्तणुकीबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सर्वेक्षणात असे आढळून आले की, प्रत्येक पाच जनरेशन एक्स उत्तरदात्यांपैकी जवळजवळ तीन जण (59%) डिलिव्हरी व्यवस्थापित करण्यासाठी त्यांच्या शेजाऱ्यांवर अवलंबून असतात, जे विश्वसनीय स्थानिक कनेक्शनचा फायदा घेण्यास एक मजबूत प्राधान्य दर्शविते. ही पिढी प्रस्थापित सामाजिक संबंधांमधील सुरक्षितता आणि विश्वासार्हतेला महत्त्व देते. या तुलनेत केवळ 52% मिलेनियल्स डिलिव्हरीसाठी त्यांच्या शेजाऱ्यांवर अवलंबून असतात. हे मिलेनियल्सचा कल तंत्रज्ञानाकडे असल्याचा बदल यातून दिसून येतो. डिलिव्हरी लॉजिस्टिक्स हाताळण्यासाठी डिजिटल टूल्स आणि स्मार्ट टेक्नॉलॉजी वापरण्याकडे मिलेनियल्सचा अधिक कल आहे.

सुरक्षित आणि सुव्यवस्थित वितरण उपायांची मागणी जसजशी वाढत जाते, तसतशी घराच्या सुरक्षिततेची गरजही वाढते. लॉक्स बाय गोदरेज अँड बाइसच्या नावीन्यपूर्ण सुरक्षा प्रणालीद्वारे या गरजा त्याच्या अत्याधुनिक डिजिटल लॉकसह पूर्ण करतात. यात सुरक्षितता आणि सोय अशा दोन्ही गोष्टींचा समावेश आहे. कीलेस एंट्री, रिमोट ॲक्सेस आणि रिअल-टाइम नोटिफिकेशन्स यांसारख्या वैशिष्ट्यांसह, हे डिजिटल लॉक जनरेशन एक्स आणि मिलेनियल्स या दोन्हींच्या विकसित गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत.

या निष्कर्षांवर भाष्य करताना गोदरेज आणि बाइसचे लॉक्स आणि आर्किटेक्चरल फिटिंग्ज आणि सीस्टम व्यवसायाचे व्यवसायप्रमुख  श्याम मोटवानी म्हणाले, “आमच्या ग्राहकांच्या गरजा आणि प्राधान्य याची पूर्तता करण्यासाठी वेगवेगळ्या पिढ्या त्यांच्या डिलिव्हरीचे व्यवस्थापन कसे करतात, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. आमचा अलीकडील अभ्यास जनरेशन एक्स आणि मिलेनियन्समधील डिलिव्हरी वेळी त्यांचे असलेले अवलंबित्व यातील स्पष्ट फरक दर्शवितो. जनरेशन एक्स त्यांच्या शेजाऱ्यांवर अवलंबून असण्याची शक्यता जास्त आहे. ही अंतर्दृष्टी गोदरेज आणि बायसमध्ये केवळ सुरक्षितता वाढविणारे उपाय उपलब्ध करून देण्याचे महत्त्व अधोरेखित करते, आम्ही आमच्या प्रगत डिजिटल लॉक सीस्टमसह या गरजा पूर्ण करण्यासाठी समर्पित आहोत, जे घरातील सुरक्षिततेसाठी आणि वितरणाचे उत्तम व्यवस्थापन करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. लोकप्रिय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर आमची उत्पादने ऑफर करून, आम्ही हे सुनिश्चित करतो की, आमच्या ग्राहकांना त्यांच्या आधुनिक जीवनशैलीमध्ये अखंडपणे बसणारे सुरक्षा तंत्रज्ञानामध्ये सहजतेने प्रवेश मिळू शकेल. सुरक्षितता आणि सोयीशी कधीही तडजोड केली जाणार नाही, याची खात्री करून, प्रत्येक ग्राहक समूहाच्या अद्वितीय गरजा पूर्ण करण्यासाठी आमच्या उत्पादन ऑफरमध्ये नावीन्यपूर्ण आणि रुपांतर करण्यासाठी वचनबद्ध आहोत.”

ब्रँड या पिढीतील बारकावे समजतो आणि विविध गरजा पूर्ण करणारी उत्पादने तयार करण्यासाठी समर्पित आहे. समाजाचा विश्वास आणि प्रस्थापित नातेसंबंधांना महत्त्व देणाऱ्या जनरेशन एक्ससाठी, गोदरेज त्यांच्या जीवनशैलीत अखंडपणे समाकलित होणारे अनेक विश्वासार्ह आणि वापरण्यास सोपे लॉकिंग सोल्युशन्स ऑफर करते. सुविधा आणि तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणाला प्राधान्य देणाऱ्या मिलेनियल्ससाठी गोदरेज प्रगत स्मार्ट लॉक आणि डिजिटल सोल्युशन्स प्रदान करते, ज्यात सुरक्षितता आणि वापरण्यास सोपे अशा दोन्ही गोष्टींचा समावेश असतो.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!