अर्थमत/ टेक्नॉलॉजी

मालबायो डायग्नोस्टिकच्या शिरपेचात मानाचा तुरा – प्रतिष्ठित कॉचोन पुरस्कार २०२५ ने सन्मानित

क्षयरोग आणि इतर संसर्गजन्य रोगांच्या निदानासाठी अत्याधुनिक आणि सहज उपलब्ध होणारी पोइंट ऑफ केअर निदान प्रणाली विकसित करणारी अग्रगण्य भारतीय कंपनी मालबायो डायग्नोस्टिक्सला कॉचोन पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले.


क्षयरोगाने त्रस्त असलेल्या रुग्णांपर्यंत नवनवीन साधने, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, दृष्टिकोन उपलब्ध करुन दिल्यामुळे मालबायो डायग्नोस्टिकने क्षयरोग निर्मूलनाच्यादिशेने अविरहतपणे काम केले. या मान्यतेद्वारे संयुक्त राष्ट्रांच्या उच्चस्तरीय बैठकीत ठरविण्यात आलेल्या क्षयरोग निर्मूलनाच्या उद्दिष्टांप्रती मालबायोने केलेल्या उल्लेखनीय योगदानाची नोंद घेण्यात आली आहे. हा पुरस्कार मिळवणारी मालबायो ही जगातील पहिली खासगी कंपनी ठरली आहे. भारतात हा पुरस्कार मिळवलेली तिसरी कंपनी आहे. यापूर्वी इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि डॉ.एल.एस. चौहान यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.

कॉचोन पुरस्कार हा दरवर्षी स्टॉप टीबी पार्टनरशिप या आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत दिला जातो. जगभरात क्षयरोगाविरोधातील लढ्यात उल्लेखनीय आणि प्रभावी योगदान देणा-या संस्था किंवा व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार कॉचोन फाऊंडेशनने संस्थेचे दिवंगत अध्यक्ष चॉन्ग-कुन ली यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्थापन केला आहे. ६५ हजार अमेकिलन डॉलर्स आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.


२०२५ सालच्या पुरस्काराचा सन्मान गेल्या वर्षाच्या २०२४च्या संकल्पनेवर आधारित होता. क्षयरोगाने पीडीत असलेल्या रुग्णांपर्यंत नवनवीन साधणे, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि आधुनिक दृष्टिकोन देणा-या संस्था आणि व्यक्तींचा सन्मान करणे ही २०२४ सालची संकल्पना आहे. मालबायो डायग्नोस्टिक संस्थेचे कार्य संयुक्त राष्ट्र संघाच्या उच्च स्तरीय बैठकीत निश्चित केलेल्या क्षयरोग निर्मूलनाच्या महत्त्वकांक्षी उद्द्ष्टांची पूर्ती करत आहेत.


नावीन्यपूर्ण ट्रूनेटद्वारे क्षयरोग निदानाचे विकेंद्रीकरण
ट्रूनेटद्वारे हे बॅटरीवर आधारित रिअल टाइम पीसीआर प्रणाली असलेले उपकरण आहे. हे उपकरण प्रवासासाठीही उपयुक्त ठरते. या उपकरणाच्या निर्मितीमुळे आता क्षयरोग निदानासाठी मोठमोठ्या प्रयोगशाळा, २४ तास वीजपुरवठा, पॉवर बॅकअप, वातानुकूलित साधने आदी सुविधांची आवश्यकता राहिलेली नाही. त्यामुळे दुर्गम आणि वैद्यकीय सेवा मर्यादित असलेल्या भागांमध्येही अचूक आणि जलद निदान करणे शक्य झाले आहे. संबंधित यंत्रणांना या उपकरणाच्या वापरामुळे अधिकाधिक लोकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्यात यश आले.


ट्रूनेट क्षयरोगाव्यतिरिक्तही अनेक महत्त्वाच्या संसर्गजन्य रोगांच्या तपासणीसाठीही उपयुक्त ठरले आहे. या तंत्रज्ञानाचा वापर हेपेटायटिस, कोविड-१९, एचपीव्ही यांसारख्या गंभीर आजारांच्या निदानासाठीही केला जातो. विविध आजारांच्या निदानासाठी हे उपकरण वापरता येत असल्याने ट्रूनेट हे सार्वजनिक आरोग्य प्रणालीसाठी अत्यंत महत्त्वाचे सर्वसमावेशक निदान उपकरण बनले आहे.


यापूर्वी इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांसारख्या सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांना हा सन्मान मिळाला आहे. मात्र मालबायो डायग्नोस्टिक्स ही कॉचोन पुरस्कार मिळवणारी जगभरातील पहिली खासगी इनोव्हेटर कंपनी ठरली आहे. हे यश क्षयरोग निदानाच्या क्षेत्रात खासगी कंपन्यांच्या नावीन्यपूर्ण योगदाना मिळालेली जागतिक मान्यता दर्शवते. मालबायो डायग्नोस्टिक या भारतीय कंपनीला हा सन्मान मिळणे हे देशासाठी अभिमानास्पद बाब आहे.
मालबायो डायग्नोस्टिक्स लिमिटेडचे मुख्य तांत्रिक अधिकारी डॉ.चंद्रशेखर नायर म्हणाले, ‘‘मालबायो कंपनी संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजार या दोन्ही प्रकारांच्या आजारांच्या निदानासाठी अचूक, किफायतशीर आणि जलद पॉइंट ऑफ केअर तंत्रज्ञान उपलब्ध करुन देण्यासाठी कटिबद्ध आहे. हे स्वदेशी आणि नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान जगभरात उपयुक्त ठरले आहे. हा सन्मान आमच्या संपूर्ण टीमच्या अथक परिश्रमांना मिळालेली पोचपावती आह. या टीमने दूरदृष्टीला प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी फार मेहनत घेतली.’’


मालबायो डायग्नोस्टिक्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. श्रीराम नटराजन म्हणाले, ‘‘ आम्ही केंद्र सरकार तसेच इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करतो. जागतिक आरोग्य संघटना तसेच जागतिक क्षयरोग समुदायाने हे उपकरण स्विकारल्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. आम्ही पुरस्काराची रक्कम कृतज्ञतेची भावना म्हणून स्टॉप टीबी पार्टनरशिपला परत देत आहोत. क्षयरोग समुदायाच्या जागतिक क्षयरोग कार्यक्रमांमध्ये मजबूत आवाज आणि सक्रिय सहभाग असेल तर आम्ही आमच्या सामायिक वचनबद्धतेची पुन्हा ग्वाही देतो.’’


मालबायोचे ट्रूनेट प्लॅटफॉर्म हे तंत्रज्ञान अत्यंत प्रभावी ठरले असून, या उपकरणाला जागतिक आरोग्य संघटना तसेच इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थांनी अधिकृत मान्यता दिली आहे. यंदाच्या वर्षी ३१ मार्च २०२५ पर्यंत जगभरातील ८० हून अधिक देशांमध्ये १० हजारांहून अधिक उपकरणांची विक्री झाली आहे. जागतिक बाजारपेठेतील वाढच्या मागणीमुळे भारतीय तंत्रज्ञानाची कार्यसिद्धी जगभरात पोहोचल्याचे सिद्ध झाले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!