google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

विजेच्या धक्क्याने 71 माणसे आणि 30 जनावरांचा मृत्यू; ‘सुदिन ढवळीकर यांनी राजीनामा द्यावा’

पणजी :

गोवा विद्युत विभागाचे कर्मचारी मनोज जांबावलीकर यांचा कर्तव्य बजावताना  विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी ऐकून धक्का बसला. 2019 ते 2024 या काळात जवळपास 71 मानव आणि 30 प्राणी विजेच्या धक्क्याने मरण पावले. वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे उत्तर गोव्याचे उमेदवार ॲड. रमाकांत खलप यांनी केली आहे.

गोवा आणि गोमंतकीयांसाठी सेवा देताना प्राण गमावलेल्या वीज खात्याचा मृत कर्मचारी मनोज जांबावलीकर यांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो, असे ॲड. रमाकांत खलप म्हणाले.

वीजमंत्री रामकृष्ण उर्फ ​​सुदिन ढवळीकर यांनी गोवा विधानसभेत माहिती दिली होती की गोवा सरकारने गेल्या 5 वर्षात गोव्यात वीज वितरण प्रणाली सुधारण्यासाठी 12 हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. एवढा मोठा खर्च करूनही लोकांचे मृत्यू सुरूच असून लोकांना वीज पुरवठा संकटाचाही सामना करावा लागत आहे, असे ॲड. रमाकांत खलप यांनी म्हटले आहे.

मिशन टोटल कमिशनवर डोळा ठेवून अवाढव्य खर्च करण्यालाच भाजप सरकारचे प्राधान्य आहे हे स्पष्ट दिसत आहे. करोडो रुपये खर्च केले तरी प्रत्यक्षात  काहीही होत नाही, असे ॲड. रमाकांत खलप म्हणाले.

गोव्यात वीज पायाभूत सुविधा पूर्णपणे कोलमडल्या आहेत. उद्योगपती, व्यापारी आस्थापने आणि सरकारी विभाग यांच्याकडून अनेक कोटी रुपयांची मोठी थकबाकी वसूल करण्यात सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. तथापि, दोन महिन्यांसाठी गरीब लोकांचे 500 रुपये चुकल्यास सरकार त्यांचे घरगुती वीज कनेक्शन तोडण्यास तत्परता दाखवते असे ॲड. रमाकांत खलप म्हणाले.

अत्यंत असंवेदनशील, बेजबाबदार आणि भ्रष्ट भाजप सरकारपासून गोव्याला मुक्त करण्याची वेळ आली आहे. कामावर असताना सरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा देण्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल आपण सर्वांनी त्यांना कायमचा धडा शिकवूया, असे ॲड. रमाकांत खलप यांनी म्हटले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!