google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

उसगाव घटनेतील युवतीची प्रकृती चिंताजनक

तरुणी आपल्या प्रेमाला सतत नकार दिल्याने वैफल्यग्रस्त बनलेल्या तरुणाने ‘व्हॅलेंटाईन डे’चा दिवस हेरून तरुणीच्या डोक्यात बियरच्या बाटलीचा जबर घाव घालून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.

या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत तसेच सध्या तिची प्रकृती गंभीर असल्याचेही समजतेय.

संबंधित संशयित तरुणाला फोंडा पोलिसांनी उसगाव पुलाजवळून आत्महत्येच्या प्रयत्नात असताना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली असून युवा वर्गात नकार पचवण्याची क्षमता नसल्याचे बोलले जातेय.

उपलब्ध माहितीनुसार, उसगाव येथील 22 वर्षीय तरुणी नेहमीप्रमाणे कामाला जाण्यासाठी म्हणून घरातून बाहेर पडली. त्यावेळी आधीपासूनच तिच्या मागावर असलेल्या तरुणाने ‘व्हॅलेंनटाईन डे’ निमित्त तिला प्रेमाची मागणी घातली.

तरुणीने नकार दिला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. आपल्याला नकार दिल्याच्या आणि तरुणीवरील एकतर्फी प्रेमाच्या रागातून त्या तरुणाने तिच्यावर दारूच्या बॉटलने प्राणघातक हल्ला केला.

गेल्या तीन महिन्यांअगोदर मंथन गावडे ह्या युवकाने आपल्या प्रेमाला नकार देत असल्याबद्दल तरुणीला तिच्या घरी जावून मारहाण केली होती.त्यावेळी तरुणीच्या नातेवाईकांनी तिस्क उसगाव पोलिस चौकीवर रीतसर तक्रार दिली होती.

पुन्हा त्या तरुणीच्या वाटेला जाणार नाही,असे त्यावेळी मंथन गावडे ह्याने लिहून दिले होते.अशी माहिती तरुणीच्या आई व मामाने दिली आहे. हल्ल्यानंतर फरार झालेल्या मंथन गावडे याला पोलिसांनी दीड तासाच्या आत ताब्यात घेतले.

उसगावातील कामावर जाणाऱ्या महिला युवतीसाठी सुरक्षितता वाढविण्याची गरज आहे. काही वर्षांपूर्वी कामावरून घरी परतणाऱ्या एका युवतीचाही असाच बळी गेला आहे अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे .

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!