गोवा ग्रीनटेक कंपनीने बीएसई एसएमई प्लॅटफॉर्मवरील आयपीओचे यश केले साजरे
डिचोली:
स्वच्छ, हिरवेगार आणि सुरक्षित भविष्य साधण्यासाठी ईपी कामत ग्रुप हरित उत्पादने प्रदान करून, पर्यावरणपूरक उपायांची पुनर्व्याख्या करत आहे. ज्यामुळे गोव्याचा कायापालट होत असून लोकांना त्यांचे कार्बन फूटप्रिंट कमी करण्यात आणि शाश्वत पर्यावरणासाठी योगदान देण्यास मदत होत आहे.
भारतातील सर्वात स्पर्धात्मक आणि प्राधान्यकृत ग्रीनटेक कंपन्यांपैकी एक होण्याचे ध्येय उराशी बाळगून, लागोपाठ मिळालेल्या यशाबरोबरच ईपी बायोकंम्पोसिट्स लिमिटेडचा, आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) लाँच झाल्यापासून, कंपनीवरील लोकांचा विश्वास अधिकच दृढ होत चालला आहे. त्यामुळे, ईपीबीएल च्या बीएसई एसएमई आयपीओ चे बहुमूल्य यश साजरे करण्यासाठी आणि अधिक एसएमई ना हा मार्ग स्वीकारण्यास प्रेरित करण्यासाठी, ईपी कामत ग्रुपने १३ ऑक्टोबर २०२२ रोजी डी’लीला बँक्वेट हॉल, मुळगाव, डिचोली-गोवा येथे एका सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे, गोव्याचे माननीय मुख्यमंत्री, डॉ. प्रमोद सावंत, प्रमुख वक्ते श्री. अजय ठाकूर – प्रमुख, एसएमई आणि स्टार्ट-अप, बीएसई इंडिया, सन्माननीय अतिथी, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांची गौरवपूर्ण उपस्थिती लाभली. या सोहळ्यात ईपी बायोकंम्पोसिट्स लिमिटेडच्या बीएसई आयपीओ च्या वाढत्या यशाबद्दल उपस्थितांकडून मिळालेल्या अनेक शुभेच्छा, कौतुक आणि टाळ्यांनी लक्ष वेधले.
ईपीबीएलच्या इको-फ्रेंडली उत्पादनांमुळे राज्यात सार्वकालिक बदल घडले आहेत. ज्यामध्ये सांडपाणी प्रक्रिया संयंत्रांसारखे स्मार्ट उपाय आहेत, जे निवासी आणि व्यावसायिक संकुलांतून निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रभावीपणे प्रक्रिया करून त्याचे व्यवस्थापन करते व नागरिकांच्या आरोग्याची आणि पर्यावरणाची काळजी घेते. कंपनी हरित उत्पादने जसे कि, बायो-डायजेस्टर टॉयलेट, एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट, एफआरपी डोअर आणि अन्य संबंधित उत्पादने देखील बनवते.
यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले; कि “आमच्या राज्यातून अशी आशादायक उत्पादने उदयास येत आहेत, हे पाहणे आश्चर्यकारक व अद्भुत आहे. भव्य आणि स्वयंपूर्ण ध्येयासह, ईपी कामत ग्रुपने गोव्याला पुन्हा एकदा देशाचे आदर्श राज्य बनवण्याच्या दिशेने पुढे पाऊल मारले आहे. ईपीबीएलच्या आयपीओ चे यश हे कंपनीच्या विश्वासार्हतेचा पुरावा आहे आणि मला खात्री आहे, की अशा समर्पित प्रयत्नांमुळे भविष्यात आम्ही आपल्या राज्यात अधिक स्वच्छ आणि हरित स्थिती नक्कीच पाहू शकू.”
प्रमुख वक्ते, एसएमई आणि स्टार्ट-अप, बीएसई इंडियाचे प्रमुख, श्री. अजय ठाकूर, यांनी ईपी कामत समूहाने गोव्यात गेल्या काही वर्षांत केलेले प्रयत्न आणि आश्वासनांची पूर्तता केल्याबद्दल गौरवोद्गार काढले. “बीएसई आज भारतातील सर्वात मोठे एसएमई व्यासपीठ आहे ज्यामध्ये ४०० हून अधिक कंपन्या सूचीबद्ध आहेत. ईपीबीएल च्या बीएसई आयपीओ चे यश पाहून मला खरोखर आनंद झाला आहे. कंपनीचा दृष्टीकोन प्रशंसनीय आहे आणि भविष्यात तो खूप उंची गाठेल. आयपीओ १७.४८ पट ओव्हरसबस्क्राइब झाला यात आश्चर्य नाही. भविष्यासाठी अनेक आशादायक आकांक्षा असलेल्या या उत्सवाचा भाग बनणे, हा आपल्यासाठी एक सन्मान आहे. तसेच मी येत्या काही वर्षांमध्ये याहून भव्य , दृढनिश्चयी प्रयत्नांचा साक्षीदार होण्यास उत्सुक आहे.”
ईपीबीएल आपली टीम आणि भौगोलिक खुणांचा विस्तार करून, आयपीओ निधी वाढीसाठी उपयोजित करेल आणि पुढील २ ते ३ वर्षांत मेनबोर्ड एक्सचेंजमध्ये स्थलांतरित होण्याची आकांक्षा बाळगेल.
यावेळी सोहळ्यात सन्माननीय अतिथी, डिचोली चे आमदार, डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी आपले विचार व्यक्त करताना, लॉन्चबद्दल कृतज्ञता आणि कौतुक केले. “ईपी कामत ग्रुप राज्याला पर्यावरणपूरक उत्पादने आणि सेवा देण्याचे उत्कृष्ट काम करत आहे. त्यांच्या फॅक्टरीमध्ये ८५% पेक्षा जास्त स्थानिकांना काम देत आहेत, याचा मला आनंद आहे. ईपीबीएल चे बीएसई आयपीओ हे अन्य अनेक एसएमई उद्योजकांना पुढे घेऊन येणारा मार्ग आहे.”
सोहळ्यात शेवटी, ईपी कामत ग्रुपचे एमडी, श्री. राजकुमार कामत, यांनी मंचावर येऊन त्यांचे अनुभव आणि गोवा राज्याबद्दल त्यांच्या आकांक्षा व्यक्त केल्या. “ईपी बायोकंम्पोसिट्स लिमिटेडच्या बीएसई आयपीओला मिळालेल्या एवढ्या मोठ्या प्रतिसादाने मी खरोखरच भारावून गेलो आहे. यासाठी मी गुंतवणूकदारांचा कंपनीवरील विश्वास आणि त्यांच्या व्यवसायाप्रतीच्या शक्यतांबद्दल त्यांचे आभार मानतो. हि आमच्या कंपनीने आतापर्यंत कमावलेली प्रतिष्ठा आणि सद्भावनेची पुष्टी देते. मला खात्री आहे, की आमच्या समर्पित प्रयत्नांनी इपीबीएल स्वच्छ, हरित आणि सुरक्षित ग्रहासाठी वचनबद्ध असा शाश्वत व्यवसाय आदर्श तयार करेल.” कंपनीला पर्यावरणपूरक आणि संरक्षणात्मक उत्पादने आणि सेवांच्या निर्मितीमध्ये कार्यरत असलेल्या व्यवसाय विभागामध्ये, उज्ज्वल संधी आहेत यावरही कामत यांनी भर दिला.
ते पुढे म्हणाले, कि “आम्ही ईपी मध्ये आज समाजाच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी योग्य उपाय देऊ शकलो आहोत. आम्ही बीच शॅक्ससाठी किफायतशीर उपाय देण्यावर तसेच बिल्डर्स आणि हाउसिंग सोसायट्यांसाठी भाडेतत्त्वावर कंटेनरीकृत एसटीपीसाठी काम करत आहोत, याशिवाय नगरपालिका आणि पंचायतींसाठी छोट्या ठिकाणी एसटीपीचे विकेंद्रीकरण यासाठीही प्रयत्न सुरु आहेत. वैयक्तिक आणि लहान इमारतींसाठी बायो डायजेस्टर व्यतिरिक्त, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अभियंते इतर विभागांसोबत, पारंपारिक सेप्टिक टाक्यांच्या तुलनेत पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून तयार केलेल्या, कमी किमतीच्या बायोडायजेस्टर टाक्यांच्या सकारात्मक प्रभावाची जाणीव झाली आहेत, याचा मला आनंद आहे. आमचे लक्ष केवळ पुरवठा करण्यावरच नाही तर झाडांचे जतन करणे आणि त्यांची देखभाल करणे, यावर देखील केंद्रित असेल जेणेकरून सांडपाण्यापासून पुनर्वापर करता येण्याजोगे शुद्ध पाणी मिळण्याचे, प्राथमिक उद्दिष्ट साध्य होईल. ज्यामुळे पर्यावरण आणि समाजाला मोठ्या प्रमाणावर मदत होईल.”
भविष्यात उत्पादनांच्या आश्वासक मालिकेसह, ईपी कामत समूह टिकाऊपणा प्रदान करण्यास, चांगल्या आर्थिक विकासाला चालना देण्यास, जीवनाचा दर्जा सुधारण्यास, आमच्या इकोसिस्टमचे संरक्षण करण्यास आणि भावी पिढ्यांसाठी संसाधनांचे जतन करण्याच्या बाजूने आहे.