जिहे -कटापूर उपसा योजनेचे ‘का’ वाजले बारा..?
सातारा (महेश पवार) :
माण व खटाव तालुक्यांचा दुष्काळी कलंक कायमस्वरूपी दूर करु शकेल अशी अत्यंत महत्वकांक्षी योजना म्हणून जिहे – कटापूर उपसा योजनेकडे पाहिलं जातं.
आम्ही पाणी आणलं, आम्ही करुन दाखवलं अशा आवाजाचं नगारे वाजत असतानाच नवलेवाडी येथे बाधित शेतकऱ्यांनी बोगद्याजवळ सुरू असलेलं कॅनॉलचं काम बंद पाडल्याने खळबळ उडाली आहे. शेतकऱ्यांची संमती न घेताच कॅनॉलचं काम सुरु केलं, बाधित शेतकऱ्यांना आजतागायत नुकसान भरपाईचा एक रुपया सुद्धा दिला नाही, असा आरोप गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
नुकसान भरपाई आणि आमच्या शेतीसाठी कायमस्वरूपी पाणी देण्याची तजवीज केल्याशिवाय पाणी पुढे जाऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा नवलेवाडीच्या शेतकऱ्यांनी घेतल्याने जिहे – कटापूर योजनेचे सध्यातरी बारा वाजल्याचं समोर आलं आहे.