अति संवेदनशील कास पठारावर उतरले हेलिकॉप्टर…
सातारा (महेश पवार) :
सातारा तालुक्यातील वर्ल्ड हेरिटेज मानल्या जाणाऱ्या कास पठार पासूनचा परिसर 200 मीटर हा अति संवेदनशील परिसर मानला जातो , याच कारणाने कास महोत्सव देखील वादाच्या भोवऱ्यात आला असताना देखील, ज्या ठिकाणी कास महोत्सव भरला त्याच जागेवर हेलीपॅड तयार करून हेलिकॉप्टर उतरल्याची माहिती समोर येत असून हेलिकॉप्टर परवानगी नेमकी दिली कोणी ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे जिल्ह्यातील वनपरिक्षेत्र आणि परिसरात आओ जाओ घर तुम्हारा अशी परिस्थिती पाहिला मिळते.
कास पठार परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये लग्नासाठी नवरा नवरीसाठी हेलिकॉप्टर आल्याची माहिती समोर येत असून या बेकायदेशीर हेलिकॉप्टर प्रकरणावर जिल्हाधिकारी यांनी कारवाई करावी अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे .