महेश पवार:
सातारा कास पठारावर फुलांच्या अनेक दुर्मीळ प्रजाती सापडल्याने या पठाराचा २०१२ साली युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत समावेश केला गेला आहे. आणि कास पठार हे जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाऊ लागले , अन् कास पठारावर धनदांडग्यांची वक्र दृष्टीच पडली आणि कास पठार परिसर भक्कास होऊ लागला.
कास पठाराच्या परिसरात यवतेश्वर-कास मार्गावर 100 पेक्षा जास्त अवैध बांधकामे आहेत. नुकताच प्रशासनाने कारवाई चा बडगा उचलला आणि काही हॉटेल्स वर कारवाई केली , परंतु अशा प्रकारे अनेकवेळा कारवाया झाल्या पण अवैध बांधकामे आणि उत्खननात वाढ होत गेली . यामुळे याठिकाणी होणा-या कारवाई एकतर नावाला किंवा आर्थिक देवाण-घेवाण करण्यासाठी कारवाई चा फार्स असल्याची पर्यावरण प्रेमी मध्ये चर्चा सुरू आहे.
आजवर अनेकदा कारवाई होऊन सुध्दा बांधकामे वाढत कशी गेली यामुळे नावाला कारवाई करण्यापेक्षा प्रशासनाने खरंतर यांवर बुलडोझर फिरवून दाखवण्याची धमक दाखवावी अशी प्रतिक्रिया निसर्ग प्रेमी कडून व्यक्त होत आहे.
जिल्हाधिकारी साहेब अवैध बांधकामे कासच्या जैवविविधतेला बाधा आणत असून जिल्हा प्रशासनाने कास पुष्प पठाराच्या संवर्धनासाठी ठोस पावले उचलण्याची खरी गरज असून , स्थानिकांच्या बांधकामांवर कारवाई न करता त्यांना संरक्षण देण्याची गरज असून बाहेरून आलेल्या धनदांडग्यांवर कारवाई करून त्यांच्या अवैध बांधकामांवर खरं बुलडोझर फिरवण्याची धमक दाखवणार का ?