‘कास’वरील आमदार पत्नीचे ‘ते’ फार्महाऊस जमीनदोस्त?
सातारा (महेश पवार) :
सातारा हेरिटेज कास पठार मार्गावरील बेकायदेशीर बांधकामांचा मुद्दा गेले कित्येक दिवसापासून गाजतोय , जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर तहसीलदार यांनी कास पठार मार्गावरील सर्व बेकायदेशीर बांधकाम धारकांना नोटीसा बजावल्या गेल्या होत्या.
जिल्हाधिकाऱ्यांच्या नोटीसीनंतर आमदार महेश शिंदे यांच्या पत्नीच्या नावे असलेलं कास पठार मार्गावरील बांधकाम पाडल्याची परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे, परंतु लोकप्रतिनिधी यांच्या कुटुंबातील सदस्यांनी जिल्ह्यधिकारी यांच्या नोटिशीची दखल घेत बेकायदेशीर बांधकाम जमीनदोस्त केले असले तरी अजूनही काही धनदांडगे जिल्हाधिकारी यांना जुमानत नसल्याचे, व राजकीय आश्रयाचा फायदा घेत आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
यामुळे कास पठार मार्गावरील उर्वरित त्या सर्व बेकायदेशीर बांधकामांचे नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.