KFC चे देशामध्ये 1000वे रेस्टॉरंट लाँच…
KFC : १९९५ मध्ये भारतात पहिले केएफसी रेस्टॉरंट लाँच झाल्यापासून ब्रॅण्डने देशामध्ये व्यापक उपस्थिती दर्शवली आहे आणि सर्वसमावेशक, समान व शाश्वत व्यवसाय पद्धतींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फिंगर-लिकिन गूड फूड सर्व्ह करण्याप्रती कटिबद्ध आहे. भारतासोबत उद्देशाने विकसित होण्याच्या विश्वासाशी बांधील राहत केएफसीने देशामध्ये त्यांचे १०००वे रेस्टॉरंट लाँच केले आहे, जो ब्रॅण्डच्या २५ वर्षांहून अधिक काळाच्या प्रवासामाधील मोठा सुवर्ण टप्पा आहे.
केएफसीच्या विकासाचे श्रेय व्यक्ती व निसर्गाप्रती त्यांच्या प्रबळ कटिबद्धतेला जाते. ब्रॅण्डचा प्रमुख डायव्हर्सिटी व इन्क्लुसिव्हीटी उपक्रम केएफसी क्षमता महिला कर्मचारीवर्गामध्ये दुप्पट वाढ करत आणि कार्यसंचालन पाहणाऱ्या स्पेशल केएफसींची (मूक व श्रवणदोष असलेल्या कर्मचाऱ्यांद्वारे ऑपरेट केले जाणारे रेस्टॉरंट्स) संख्या दुप्पट करत लिंग व क्षमता पोकळी दूर करण्यावर लक्ष केंद्रित करतो. गेल्या दशकभरात केएफसीने ४२ स्पेशल केएफसी स्थापित केले असून त्यामध्ये २२० हून अधिक मूक व श्रवणदोष असलेल्या कर्मचाऱ्यांची टीम आहे. २०२१ मध्ये ब्रॅण्डने कोविड-१९ महामारीच्या प्रादुर्भावानंतर १००० स्थानिक रेस्टॉरंट्स व फूड जॉइण्ट्सना साह्य करण्यासाठी त्यांचा केंद्रित उपक्रम केएफसीचा इंडिया सहयोग लाँच केला, ज्यामुळे त्यांना त्यांचे व्यवसाय पुन्हा सुरळीत करता आले आहेत.
केएफसीच्या फ्रँचायझी सहयोगी देवयानी इंटरनॅशनल लिमिटेड आणि सफायर फूड्स इंडिया लिमिटेड (एसएफआयएल) यांनी ब्रॅण्डच्या विकासाला गती देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारतातील प्रवासाच्या पुढील टप्प्यामध्ये केएफसीला देशभरात १ लाख रोजगार निर्माण करण्याची आशा आहे, जे भारतीय अर्थव्यवस्थेचा सकारात्मक विकास दृष्टीकोनामध्ये अधिक भर करते.
देवयानी इंटरनॅशनल लिमिटेडचे नॉन-एक्झिक्युटिव्ह चेअरमन रवी जयपुरिया म्हणाले, ”हा अविश्वसनीय टप्पा गाठण्यासाठी केएफसी इंडियाचे अभिनंदन. देवयानी इंटरनॅशनलमध्ये आम्हाला १९९५ मध्ये भारतात प्रवेश केल्यापासून ब्रॅण्डच्या प्रवासाचा भाग असण्याचा अत्यंत अभिमान वाटतो. आम्ही भारतात विकास करण्याच्या आणि अर्थव्यवस्थेमध्ये योगदान देण्याच्या केएफसीच्या महत्त्वाकांक्षांना पाठिंबा देतो. आम्ही सहयोगाने विकासाचा हा पुढील टप्पा गाठण्यासाठी उत्सुक आहोत.”