14 फेब्रुवारी रोजी कोकणी भाषा मंडळाचा ‘पेटुल’
कोंकणी भाषा मंडळाचा कवी मनोहरराय सरदेसाई स्मृती बालगिते, बालसाहित्य व शैक्षणिक साहित्याचा ‘पेटूल’ हा कार्यक्रम 14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4.00 वाजता पाय तियात्रीस्त सभाघर, रवींद्र भवन, मडगाव येथे होणार आहे. मंडळाने तयार केलेली उमाणीं, निबंद- एक मार्गदर्शक सांगाती, भारताचीं आनी गोंयचीं प्रतीक चिन्नां ही बालसाहित्याची पुस्तके तसेच मज्जा मस्ती 1 पेन ड्राइव्ह या कार्यक्रमात विमोचित करण्यात येणार आहेत.
पेटूल कार्यक्रमाला फोमेंतो ग्रुप ऑफ कंपनीजचे चॅरमेन अवधूत तिंबलो यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ज्येष्ठ लेखक आणि कोकणी कार्यकर्ते फा. मेन्युएल गोम्स, पुण्यातील कहानी किड्स लायब्ररीची संस्थापक गायत्री पटवर्धन, शिक्षण संचालनालयाच्या उपसंचालक सिंधू प्रभुदेसाई, बुक्स दॅट स्किप च्या संस्थापक आसावरी दोशी, तामनार ट्रान्समिशन प्रोजॅक्ट लिमिटेड (गोवा)चे – प्रकल्प संचालक देवानंद सिंग हे विशेश अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
लिटल्स प्री प्रायमरी अँड प्रायमरी स्कूल- मडगाव, फातिमा कॉन्व्हेंट हायस्कूल- मडगाव, रवींद्र केळेकर ज्ञानमंदिर- मडगाव, विद्याभुवन कोंकणी शाळा- मडगाव, विद्याभुवन पुर्व प्राथमीक शाळा- मडगाव, होली रोझरी कॉन्व्हेंट हायस्कूल- नुवें, भाटीकर मॉडेल प्राथमिक शाळा- मडगाव, मनोविकास इंग्लिश मीडियम स्कूल- मडगाव, सचिकास स्कूल ऑफ क्लासिकल डान्स- मडगांव मज्जा मस्ती आणि शाणी मस्ती सिडितील गाण्यांवर नृत्ये सादर करतील.
बालसाहित्य आणि शैक्षणिक साहित्य निर्मितीत मोलाचे योगदान देणार्या विविध लेखक, कलाकार, अनुवादक, संगीतकार, गायक यांचा या वेळी गौरव करण्यात येणार आहे.
मंडळाने गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांसाठी शाणी मस्ती १ ते ७ या बालगीतांच्या सीडी प्रकाशित केल्या आहेत. गोवा मुक्ती चळवळीवर आधारित 16 जानेरा आणि नमस्कार भारता या सिडीही त्यांनी प्रसिद्ध केल्या आहेत. माणकुल्यांची कवनां ही बडबड गाणी सिडी आणि पुस्तकरूपात प्रकाशित झाली आहेत. याशिवाय त्यांनी चरित्रे, माहिती पुस्तिका, सुविचार, पथनाट्य, कथा अशी अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत. ही सर्व प्रकाशने पेटुल कार्यक्रमा दरम्यान प्रदर्शनास आणि विक्रीसाठी उपलब्ध असतील.