नांदगावात बांधकाम कामगारांना प्रथमोपचार पेटीचे वाटप
कराड (अभयकुमार देशमुख) :
आपल्याकडे १ मे हा दिवस जसा ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून साजरा केला जातो .तसाच ‘कामगार दिन ‘ म्हणूनही ओळखला जातो. याच कामगार दिनाचे औचित्य साधून नांदगाव येथील ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे यांच्या वतीने गावातील सुमारे 15 बांधकाम कामगारांना प्रथम उपचार पेटी (फर्स्ट एड बाँक्स )चे वाटप करण्यात आले. सदर उपक्रमाचे ग्रामस्थांच्यातून कौतुक होत आहे.
उपक्रमांची माहिती देताना प्रशांत सुकरे म्हणाले, बांधकाम कामगार हा कामावर असताना अनेकदा त्याला दुखापत होते.अंगदुखी, डोखेदुखी,ताप येणे असे प्रकार घडतात. मात्र रूग्णालय जवळ नसण्याने किंवा कामाचा वेळ वाया जाईल म्हणून तो तशीच वेळ मारून नेतो. परिणामी त्रास सहन करावा लागतो. हीच बाब लक्षात घेऊन कामगार दिनाच्या निमित्ताने गावातील बांधकाम क्षेत्रात कामगारांना प्रथमोपचार पेटी देण्यात आली आहे. याचा त्यांना निश्चितच फायदा होईल.
यावेळी गणेश कांबळे, सचिन जाधव, पांडुरंग आवळे, मारुती लोहार ,पांडुरंग कुंभार, निशिकांत चव्हाण ,दिनेश काटे, देवानंद काटे, विकास पवार, शिवाजी नलावडे आदींना याचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमास माजी ग्रामपंचायत सदस्य वसंत माटेकर ,बाजार समितीचे माजी संचालक सतीश कडोले, राहुल पाटील, सुहास पाटील, रघुनाथ जाधव ,मोहन कुचेकर, शरद शिनगारे, संतोष पाटील, गणेश पाटील ,कुमार चौधरी, संजय तलबार ,अमर कदम आदी मान्यवरांची उपस्थिती होती.