विहिरीत पडून बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू…
कराड (प्रतिनिधी) :
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार धोंडेवाडी नांदगाव खिंड दरम्यान ढोकरमाळ नावाचे शिवार आहे. या ठिकाणी विश्वनाथ महिपती काकडे यांची शेत विहीर आहे. काकडे पहाटे विहिरीतील पाण्याचा अंदाज घेण्यासाठी गेले असता पाण्यात मूर्त अवस्थेत बिबट्याचा बछडा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आला घटनेची माहिती त्यांनी अन्य शेतकऱ्यांना दिली तसेच वनविभागाला कळवले घटनेचे गांभीर्य ओळखून कराड वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन मृत बछड्याला जाळीच्या साह्याने विहिरीवर काढून ताब्यात घेतले.
बछड्याचा नेमका मृत्यू कशामुळे झाला याचा शोध वन विभागाचे कर्मचारी घेत आहेत. कराड वनक्षेत्रपाल तुषार नवले, वनपाल आनंद जगताप, वनरक्षक अभिजीत शेळके, सुभाष गुरव सचिन खंडागळे, वनसेवक अमोल माने, धनाजी गावडे, भरत पवार, योगेश बडेकर, हनुमंत मिठारे यासह शेतकऱ्यांनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी परिश्रम घेतले.
सदर मृत बछडा मादी जातीचा असून सात आठ महिन्यांचा असून अंदाजे 15 ते 20 किलो वजनाचा असल्याचे तुषार नवले यांनी सांगितले. तसेच शिकारीच्या शोधात तो विहिरीत पडल्याचा प्राथमिक अंदाजही त्यांनी व्यक्त केला.