क्रीडा

महाराष्ट्राने पटकावली ​बीच स्प्रिंट रोइंग नॅशनल्स ‘मनोहर पर्रीकर ट्रॉफी’

पणजी :​ 

​येथील दोना पाउला येथील बीचवर २६ ते २८ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या पहिल्या ‘बीच स्प्रिंट नॅशनल रोइंग चॅम्पियनशिप गोवा २०२६’ स्पर्धेत महाराष्ट्राने महिला गटात पद्मभूषण मनोहर पर्रिकर रोलिंग ट्रॉफी पटकावली.

रोइंग फेडरेशन ऑफ इंडियातर्फे, रोइंग अँड स्कलिंग असोसिएशन ऑफ गोवा यांच्या सहकार्याने आणि गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या ​संयुक्त विद्यमाने या तीन दिवसीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील विविध राज्यांतील खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.

स्पर्धेची सुरुवात पहिल्या दिवशी टाइम ट्रायल्सने झाली. दुसऱ्या दिवशी नॉकआउट आणि उपांत्यपूर्व फेऱ्या पार पडल्या, तर अंतिम दिवशी उपांत्य आणि अंतिम सामने झाले. बीच स्प्रिंट प्रकारात वाळूवरील धाव, खुल्या समुद्रातील लघु पण उच्च तीव्रतेचा रोइंग मार्ग आणि शेवटची अंतिम धाव यांचा समावेश असल्याने खेळाडूंचा वेग, सहनशक्ती आणि रणनीतीची कसोटी लागली.

स्पर्धेचा समारोप पदक वितरण समारंभाने झाला. यावेळी भारतीय ऑलिंपिक संघटनेचे कार्यकारी परिषदेचे सदस्य अमिताभ शर्मा तसेच रोइंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि गोवा क्रीडा प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. या स्पर्धेमुळे गोव्यातील जलक्रीडा आणि किनारी क्रीडा प्रकारांसाठी उपलब्ध होत असलेल्या वाढत्या पायाभूत सुविधा आणि पाठिंब्याचे चित्र स्पष्ट झाल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!