
महाराष्ट्रातील पहिल्या म्युझिकल रस्त्याचे शिवेंद्रराजेंच्या हस्ते लोकार्पण…
सातारा (महेश पवार) :
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या संकल्पनेतून साताऱ्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते जुना आरटीओ चौक या मार्गावर महाराष्ट्रातील पहिला म्युझिकल रोड साकारण्यात आला आहे. या रस्त्यावरील डेकोरेटिव्ह लॅम्पवर स्पीकर बसवण्यात आले आहेत. पहाटेच्यावेळी भक्तिसंगीताच्या सुरांनी हा परिसर भारून जाणार आहे. यामुळे सातारकरांना एक नवीन आणि आध्यात्मिक अनुभव मिळणार आहे. या म्युझिकल रोडचे शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते लोकार्पण पार पडला.
नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते जुना आरटीओ चौक हा मार्ग पूर्वी अत्यंत खराब होता. वाहन चालवतानामस्तकाची शिर उठावी इतके खाचखळगे या मार्गावर होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या संकल्पनेमुळे या मार्गाचे रूपडे पालटले आहे. नगरोत्थान योजनेतून या मार्गासाठी १० कोटींची तरतूद करण्यात आली. कधीकाळी साताऱ्यातील सर्वात खराब असलेला मार्ग आता सर्वात सुंदर व आधुनिक बनला आहे. या रस्त्याचे काम ए एस देसाई इन्फ्रा च्या वतीने करण्यात आले असून साताऱ्यातील वाहनधारकांकडून सातारा पालिकेचे तसेच ए एस देसाई इन्फ्रा च्या वतीने करण्यात आलेल्या कामांचे कौतुक होत आहे.