google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

मटकावाले ठरताहेत पोलिसांवर शिरजोर..?

सातारा (महेश पवार) :

बाजीराव सिंघम म्हटलं की सर्वांनाच जिगरबाज पोलीस आठवतो. किंबहुना बाजीराव सिंघमचा थाट फक्त पोलिसानेच करावा, ऐऱ्या गैऱ्याचं ते काम नाही. साताऱ्यात मात्र मटकावाले भलतेच फर्मात आहेत. दिवसाढवळ्या उघड्यावर मटका घेताना या मटकावाल्यांचा रुबाब आणि देहबोली अशी पहायला मिळते की जणू ते म्हणत असावेत ‘जिसमे है दम वही है बाजीराव सिंघम.

डॅशिंग पर्सनॅलिटी असलेले पोलीस अधीक्षक जिल्ह्याला लाभले आहेत. साताऱ्यात आल्यानंतर आतापर्यंतची त्यांची कार्यशैली प्रशंसनीय अशीच दिसून आली आहे. गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यात पोलीस प्रशासनाला चांगले यश मिळाले आहे. एकीकडे ही बाजू सकारात्मक दिसत असली तरी सातार्‍यात मटका आणि जुगाराच्या माध्यमातून अवैध धंदे सर्रास सुरु आहेत. मटकावाल्यांना नेमकं कोणाचं अभय आहे, असा प्रश्न नागरिकांना पडल्यावाचून रहात नाही. पोलीस अधीक्षकांनी मटका, जुगाराच्या माध्यमातून सुरु असलेल्या अवैध धंद्याना चाप लावावा अशी मागणी होत आहे. अनेकदा कारवाई करून देखील मटका तेजीत असल्याने सातारा पोलीसाची मटका व्यवसायिकांनी दहशत मोडीत काढली की काय असा संतप्त सवाल सातारकर करत आहे.

सातारा शहरातील पंचायत समितीच्या भिंतीलगत एक मटका व्यावसायिक मटक्याची आकडेमोड करताना चित्र पाहायला मिळालं मटका घेणाऱ्याला पाहून मनात एक प्रश्न उपस्थित झाला यांनी शाळेमध्ये असताना देखील गणिताचा इतका मन लावून अभ्यास कधी केला नसेल , मात्र मटक्याची मन लावून आकडेमोड करताना अतिशय मग्न अवस्थेत पहायला मिळाला .

https://fb.watch/iAhzEwyjQs/?mibextid=RUbZ1f

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!