व्लादिमीर पुतीन यांचा मृत्यू; ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेचा दावा
नवी दिल्ली:
ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा एमआय ६ च्या (MI6) प्रमुखांनी व्लादिमीर पुतीन यांचा गंभीर आजारामुळे मृत्यू झाला असू शकतो, असा दावा केलाय. त्यांच्या या दाव्याने जगभरात खळबळ उडाली आहे.
रशियाने युक्रेनसोबतच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुतीन यांच्या मृत्यूची बातमी लपवण्यासाठी या काळात पुतीन यांच्या बहुरुप्याचा (बॉडी डबल) वापर केला जात असल्याचाही आरोप होतोय. याबाबत ब्रिटनच्या मिरर संकेतस्थळाने ‘द डेली स्टार’च्या हवाल्याने वृत्त दिलं आहे.
मागील काही महिन्यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची प्रकृती गंभीर झाल्याचं बोललं जात आहे. सर्वात शेवटी युक्रेनसोबतच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुतीन माध्यमांमध्ये दिसले होते. मात्र, त्यावेळी त्यांचा चेहरा फुगलेला दिसल्याचं बोललं जातंय. अनेक जाणकार ६९ वर्षीय पुतीन यांना रक्ताचा कर्करोग (Blood Cancer) झाल्याचाही दावा करत आहेत.
या पार्श्वभूमीवर ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा एमआय ६ ने देखील गंभीर आजारामुळे व्लादिमीर पुतीन यांचा मृत्यू झाला असू शकतो आणि रशियाकडून ही बातमी लपवण्याचा प्रयत्न केला जात असावा, अशी शंका व्यक्त केलीय.