दुष्काळजन्य परिस्थितीत आ. महेश शिंदे यांच्या खेदजनक वक्तव्य…
सातारा (महेश पवार) :
सातारा जिल्ह्यात पूर्वभाग हा दुष्काळी तर पश्चिम भाग हा अतिशय पावसाळी भाग म्हणून ओळखला जातो. याच पश्चिम भागात असलेल्या धरणांच्या माध्यमातून दुष्काळी पट्ट्यातील गावांना पाणीपुरवठा करून त्यांची तहान भागवली जाते.
परंतु यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे पश्चिम भागातच दुष्काळ परिस्थिती ओढावली असताना चार माही असलेल्या जिहे कठापूर योजनेच्या पाणी पुजनाच्या नावाखाली दुष्काळी परिस्थितीमध्ये पाण्याची पळवा पळवी सुरू आहे.परिणामी पश्चिम भागातील शेतकरी संतप्त असताना नुकतेच कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून वर्णी लागलेल्या महेश शिंदे यांनी ऐन दुष्काळात खेदजनक वक्तव्य करून पश्चिम भागातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला असल्याची तीव्र प्रतिक्रिया पश्चिम भागातील शेतकऱ्यांमधून उमटत आहे.