जिलेटीनचा स्फोट करुन महाराष्ट्र बँकेचे ATM फोडले…
सातारा :
जिल्ह्यातील जिलेटीन स्फोट करून एटीएम वर बुधवारी पहाटे रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास दरोडा , हा दरोडा पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा पासून अवघ्या पंधरा किलोमीटरवर मुख्य राज्य मार्गावर असलेल्या नागठाणे चौकातील बँक ऑफ महाराष्ट्र च्या एटीएम वर दरोडा टाकला असून एटीएम जिलेटिनच्या कांड्याने स्फोट करून ATMउडवून दिले व यामधील रोख रक्कम घेऊन पळून जाण्यात दरोडो खोर पळून जाण्यात यशस्वी झाले.
या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या एटीएम मध्ये नक्की किती रक्कम लंपास केली आहे याबाबत अजूनही अधिकृत माहिती मिळाली नसून याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.
गेल्या काही दिवसापूर्वी कराड शहरानजीक विद्यानगर परिसरामध्ये देखील असाच धाडसी दरोडा टाकण्यात आला होता. यामध्ये एक जण ताब्यात घेण्यात आले होते .