‘का’ म्हणाले पंतप्रधान मोदी, ‘आज मी प्रभू रामाची माफीही मागतो’
रामलल्ला अयोध्येत परतले आहेत. प्रभू श्रीराम आता तंबूत राहणार नाहीत. हे वातावरण, हा क्षण हे सगळं आपल्यासाठी प्रभू रामाचा आशीर्वाद आहे. २२ जानेवारी २०२४ ही कॅलेंडरवर लिहिलेली तारीख नाही. ही नव्या कालचक्राची सुरुवात आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर देशात उत्साह मोठ्या प्रमाणावर वाढला. देशातल्या लोकांमध्ये रोज एक नवा विश्वास निर्माण होत होता असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
माता जानकी, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या सगळ्यांनाही मी नमन करतो. मी दिव्य चेतना आपल्या शेजारी आहेत असं वाटतं आहे मी त्यांनाही नमन करतो आहे. आज मी प्रभू रामाची माफीही मागतो आहे. आमचा पुरुषार्थ, त्याग आणि तपस्येत काहीतरी कमतरता राहिली असेल. त्यामुळेच आपण इतकी युगं हे करु शकलो नाही. आज ती कमतरता आपण भरुन काढली आहे. मला विश्वास आहे की प्रभू राम आज आपल्याला माफ करतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
आपल्या अनेक पिढ्यांनी जे धैर्य दाखवलं त्या धैर्याचा वारसा आज आपल्याला मिळाला आहे. गुलामीची मानसिकता तोडून आपण नवराष्ट्र निर्मिती करतो आहोत. अशाच प्रकारे नवा इतिहास लिहिला जातो. आजपासून एक हजार वर्षांनीही आजचीही तारीख लक्षात ठेवतील. ही रामाचीच कृपा आहे. आज आपण सगळे हा क्षण आपण जगतो आहोत, आपण पाहतो आहोत. आजचा दिवस, दिशा सगळं काही दिव्य झालं आहे. ही वेळ सामान्य नाही. कालचक्रावर केलेली स्मृतीची अमिट स्मृती आहे. आपल्याला सगळ्यांन ठाऊक आहे की रामाचं काम जिथे असतं तिथे पवनपुत्र हनुमानही विराजमान असतात. मी आज रामभक्त आणि हनुमानगढीलाही प्रणाम करतो.