लोकप्रिय नेत्यांच्या यादीत PM मोदीं आघाडीवर
पॉप्युलर ग्लोबल लीडर्सच्या ताज्या यादीत जगातील सर्व नेत्यांना मागे टाकत पंतप्रधान मोदी पहिल्या स्थानावर आहेत. बिझनेस इंटेलिजन्स कंपनी, मॉर्निंग कन्सल्टने एक सर्वेक्षण केले आहे. त्यांच्या ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंगमध्ये, पीएम मोदींनी ऋषी सुनक, जो बायडन यांच्यासह 22 देशांच्या नेत्यांना मागे टाकत सर्वात लोकप्रिय नेत्याचा किताब जिंकला आहे. सर्वेक्षणात 78 टक्के रेटिंगसह पीएम मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत.
दरम्यान, दुसऱ्या क्रमांकावर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष लोपेझ ओब्राडोर आहेत. त्यांना 68 टक्के रेटिंग मिळाले आहे. लोकप्रियतेच्या यादीत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांना 58 टक्के रेटिंग मिळाले आहे. ते तिसऱ्या क्रमांकावर आहे.
दुसरीकडे, इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांना 52 टक्के रेटिंग मिळाले आहे. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लालू डी सिल्वा 50 टक्के रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर आहेत. या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन सहाव्या तर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो सातव्या क्रमांकावर आहेत. दोघांना 40 टक्के रेटिंग मिळाले आहे.
त्याचबरोबर, ब्रिटनचे पीएम ऋषी सुनक यांना 30 टक्के रेटिंग मिळाले आहे. ते 16 व्या स्थानावर आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रान 29 टक्के रेटिंगसह 17 व्या क्रमांकावर आहेत.
तसेच, मॉर्निंग कन्सल्टंटने ज्या 22 देशांचे सर्वोच्च नेते स्थान दिले आहे ते आहेत- युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, युनायटेड किंगडम, स्वित्झर्लंड, स्वीडन, स्पेन, दक्षिण कोरिया, पोलंड, नॉर्वे, नेदरलँड, मेक्सिको, जपान, इटली, आयर्लंड, भारत, जर्मनी, फ्रान्स , झेक प्रजासत्ताक, कॅनडा, ब्राझील, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रिया.