google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
क्रीडादेश/जग

Olympics 2024 : भारताच्या खात्यात दुसरं पदक…

Olympics 2024 Manu Bhaker Sarabjot Singh : मनू भाकेर व सरबजोत सिंह या नेमबाजांच्या जोडीने भारताला १० मीटर एअर पिस्तुलच्या मिश्र दुहेरी प्रकारात कांस्य पदक जिंकवून दिलं आहे. या जोडीने दक्षिण कोरियाच्या ली ओन्हो आणि ओह ए जिन यांचा १६-१० अशा मोठ्या फरकाने पराभव करत कांस्यपदक पटकावलं आहे. मनू भाकेरचं हे यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेतल वैयक्तिक दुसरं पदक आहे. या ऐतिहासिक कामगिरीसह मनू ही स्वतंत्र भारताला एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदकं मिळवून देणारी पहिलीच खेळाडू ठरली आहे.

दरम्यान, या सामन्यात भारतीय संघाने पहिला सेट गमावला होता. मात्र, दुसऱ्या सेटपासून या जोडीने सातत्याने आघाडी मिळवली. पाचवा सेट कोरियाने जिंकला. मात्र इतर सर्व सेट्सवर मनू व सरबजोतचं वर्चस्व राहीलं. सबरजोत तीन वेळा मागे पडला होता. मात्र त्यानतंर मनूने शानदार नेम साधून भारतीय संघाचं वर्चस्व कायम ठेवलं आणि अखेर कांस्य पदकाला गवसणी घातली.

दरम्यान, भारताने लंडन ऑलिम्पिक २०१२ नंतर पहिल्यांदाच नेमबाजीत दोन पदकं पटकावली होती. मनु व सरबजोत या जोडीने पात्रता फेरीत ५८० गुण मिळवत कांस्य पदकासाठीच्या सामन्यात स्थान निर्माण केलं होतं. या सामन्यात कोरियाने चांगली सुरुवात केली होती. तर सरबजोतने धिमी सुरुवात केली. पहिल्या फेरीत कोरियन संघाने २०.५ तर भारतीय संघाने १८.८ गुण मिळवले होते. मात्र त्यानंतर मनू व सरबजोतने संयमी खेळ सादर केला. दुसऱ्या फेरीत भारतीय जोडीने २१.२ तर कोरियाने १९.९ गुण मिळवले होते.

तिसऱ्या फेरीत भारताने पुन्हा बाजी मारली. या फेरीत मनू-सरबजोत जोडीने २०.८ तर कोरियन संघाने १९.८ गुण मिळवले. पाचव्या फरीत भारतीय संघ मागे पडला होता. मात्र तोवर भारतीय संघ एकूण गुणांच्या बाबतीत पुढे निघून केला होता. सहाव्या फेरीआधी कोरियन संघाने टाईम आऊटची मागणी केली, मात्र त्याचा त्यांना फायदा झाला नाही. अखेरपर्यंत भारतीय जोडी कोरियन संघावर वरचढ ठरली आणि त्यांनी कांस्य पदकावर दावेदारी सिद्ध केली.

मनू भाकेर ही ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली होती, तर आता तिने आणखी एक मोठा विक्रम केला आहे. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी स्वतंत्र भारताची ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!