Pathan ठरला भारतातला सर्वात मोठा ‘ओपनर’
शाहरुखच्या पठाणचीच (pathan) चर्चा दिवसभर सुरू होती. चाहत्यांनी पठाण इतका डोक्यावर घेतला की रिलीज झाल्यानंतर थिएटरबाहेरचा जल्लोष एखाद्या उत्सवासारखा होता. हे दृश्य एखाद्या सणापेक्षा कमी नव्हते. आता पठाण (pathan) बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड मोडत आहे. पठाणने KGF: Chapter 2 आणि War चे रेकॉर्ड तोडले आहेत.
पठाणचा हँगओव्हर लोकांना आता व्यक्त व्हायला लावत आहे. सगळीकडे फक्त पठाण, पठाण, पठाण अशीच चर्चा आहे. थोडक्यात शाहरुख बाजीगर ठरला आहे. कुठे नाट्यगृहात नाचत तर कुठे फटाके फोडून पठाणच्या रिलीजचा आनंद साजरा केला. पठाणच्या धमाकेदार एंट्रीने चित्रपटगृहांमध्ये पुन्हा एकदा चमक आली…
अशी क्रेझ तुम्ही याआधी कुठे पाहिली आहे का? तसे, चाहत्यांना वेड लागणंच बाकी आहे असं वातावरण प्रत्येक थिएटरबाहेर आहे. अखेर किंग खानने तब्बल 4 वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले आहे. शाहरुखचा पठाण रिलीज झाल्यानंतर चित्रपटगृहाबाहेर जल्लोष झाला. हे दृश्य एखाद्या सणापेक्षा कमी नव्हते.
पठाण बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड मोडत आहे. ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांच्या मते पठाणने पहिल्या दिवशी 54 कोटींची कमाई केली आहे. यासह शाहरुख खानचा आतापर्यंतचा सर्वात मोठा नॉन हॉलिडे ओपनर चित्रपट बनला आहे. पठाणने KGF: Chapter 2 चाही रेकॉर्ड मोडला आहे.
भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात मोठे ओपनिंग कलेक्शन KGF: Chapter 2 च्या नावावर होते. KGF 2 च्या हिंदी डबने पहिल्या दिवशी 53.95 कोटी रुपये कमावले आहेत.यशच्या चित्रपटाने पहिल्या दिवसाच्या कलेक्शनपासून सर्व हिंदी चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले. KGF Chapter 2 नंतर, बॉलीवूडचा सर्वात मोठा ओपनिंग कलेक्शन चित्रपट वॉर होता.