सातारा
ॲड. शिवप्रसाद वाघमोडे यांचे पालिकेला निवेदन
सातारा (महेश पवार) :
सामाजिक कार्यकर्ते ॲड. शिवप्रसाद वाघमोडे यांनी आरोग्य अधिकारी बनकर सातारा नगरपरिषद सातारा यांच्याकडे निवेदन सादर केले.
सामाजिक कार्यकर्ते ॲड. शिवप्रसाद वाघमोडे यांनी आरोग्य अधिकारी बनकर सातारा नगरपरिषद सातारा यांच्याकडे निवेदन सादर केले.
प्रभाग क्रमांक 9 मधील आदर्श कॉलनी आणि लगतच्या परिसरातील आरोग्य संबंधी समस्या, नालेसफाई झाडेझुडपांची सफाई होत नसलेबाबत तसेच भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट प्रचंड प्रमाणात वाढला असलेबाबत ,व त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले बाबत त्याचप्रमाणेआदर्श कॉलनी ते चैतन्य कॉलनी जोडला जाणारा पूल लगत साठलेले पाणी व त्यामुळे होणारे आरोग्यवरील होणारे दुष्परिणाम या संदर्भात ॲड. शिवप्रसाद वाघमोडे यांनी चर्चा केली व तात्काळ कारवाई बाबत अर्ज दिला.
यावेळी परिसरातील चंदन चव्हाण, शैलेश वाघमोडे,किरण साबळे, प्रतीक गायकवाड, प्रसाद खरात व इतर युवा वर्ग उपस्थित होते. यासंदर्भात बडेकर यांनी तातडीने समस्यांचे निरसन करण्याचे आश्वासन दिले आहे.