अधिकाऱ्यांना पाकीट आणि घंटा चालकांना थाळी ?; सातारा पालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर…
सातारा (महेश पवार) :
सातारा शहरात एन्ट्री करताना सर्वत्र स्वच्छ सुंदर सातारा असे बोर्ड पाहिला मिळतात परंतु त्या बोर्ड खालीच कचऱ्याचं मोठ्या प्रमाणात खच दिसतो. हा प्रकार आजचा नव्हे तर गेले कित्येक वर्षापासून सुरू आहे. सातारा पालिका सातारा वासियांकडून सोयी सुविधा पुरविण्यासाठी प्रत्येक नागरिकाकडून कर स्वरूपात पैसे गोळा करते परंतु याच पालिकेतील काही भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदारांमुळे पालिकेच्या सोयी सुविधा नागरिकांना पर्यंत पोहोचत नाहीत यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
यातच काल सातारा शहरांमध्ये एक हास्यस्पद गोष्ट घडली असून शहरातील नागरीक उघड्यावर कचरा टाकतायेत म्हणून पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी चक्क दगडाला शेंदूर फासून त्या ठिकाणी म्हसोबाची स्थापना केली, परंतु पालिकेची घंटागाडीच वेळेत नागरिकांना सेवा देत नसल्याने नागरिकांना रस्त्यावर कचरा टाकावा लागतो.
दरम्यान, सातारा नगर पालिका हद्दीतील नागरिक रस्त्यावर कचरा टाकतायेत म्हणून दगडाला शेंदूर फासून लोकांना कचरा टाकण्यासाठी मज्जाव करते. परंतु याच सातारा नगर पालिकेच्या गाड्या शहराबाहेर असलेल्या हॉटेल मानस आणि माउंटन व्ह्यू ची हाडके गोळा करण्यासाठी जात असल्याने शहरातील नागरिकांना कचरा गाडी न आल्याने कचरा उघड्यावर टाकावा लागतो.
यामुळे सातारा नगर पालिकेच्या घंटा गाड्या नक्की कोणासाठी आणि कोणाच्या सांगण्यावरून ही हडके गोळा करते , याचं उत्तर सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट उत्तर देणार का ? आणि संबंधितांवर कारवाई करणार का ? याकडे संपूर्ण सातारावासियांचे लक्ष लागून राहिले आहे.