सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक नक्की कोणाच्या आदेशानुसार चालते?
सातारा (महेश पवार) :
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बँक म्हणवल्या जाणाऱ्या बँकेत व्हीआयपी संचालकांचा भरणा होताच ! पण हाती आलेल्या माहितीनुसार सातारा जिल्हा बँक नक्की कोणाच्या आदेशानुसार चालते हे जिल्हा बँकेला स्पष्ट करावं लागेल.
सातारा जिल्ह्यातील लोकांचे श्रद्धास्थान, दस्तूरखुद्द उदयनराजे भोसले हे जिल्हा बॅंकेचे संचालक असून बँकेला केंद्रीय तपास यंत्रणांनी काढलेल्या नोटीशी बाबतीत माहिती मागितली परंतु जिल्हा बँकेचे सिइओ राजेंद्र सरकाळे यांनी प्रोटोकॉलच्या नावाने, तसेच बोर्ड परमिशन शिवाय, चेअरमनच्या मंजुरी इत्यादी गोष्टी सांगत उदयनराजेंना माहितीसाठी अर्ज करायला लावला होता.
मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारी, पत्रकारांचे प्रश्न यांना वेगळा प्रोटोकॉल व मनमानी नियम ,तर मग सातारा जिल्हा बँकेचे संचालक नसलेले, जिल्ह्यातील नसलेल्या अजित पवार यांना काही संचालक, आणि बँकेचे सिइओनी कोणत्या विशेष अधिकारात जिल्हा बँकेच्या कारभाराची माहिती विनाअर्ज, विना बोर्ड मीटिंग उपलब्ध करून दिली? यामुळे जिल्हा बँकेच्या कारभाराच्या गोपनियंतेविषयी फार मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होतेय .
अजित पवार यांनी जिल्हा बॅंकेच्या मिटिंगमध्ये नेमकं काय झालं या सर्व बाबींचा खुलासा केला , यामुळे अजित पवार यांनी बँकेच्या कारभाराबद्दल प्रतिक्रिया दिली याचा अर्थ असा होतो का की त्यांना जिल्हा बँकेच्या कारभाराबाबत जो ऍक्सेस”आहे तो जिल्हा बँकेचे प्रतिनिधित्व करणार्यांना नाही!
संपूर्ण जिल्हा अशा प्रकारे परजिल्ह्यातील पुढारी चालवतात हे स्पष्ट होतंय आणी मग त्यांचे अप्रत्यक्ष दलाल जिल्ह्यातील महत्वाच्या सहकारी संस्था, सिंचन योजना, कारखाने यात पेरले असण्याची शक्यता नाकारता येतं नाही.
यामुळेच जिल्हा बॅंकेच्या कारभाराबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आता तरी जिल्हा बॅंक गैरकारभाराबाबत खुलासा करणार का ? असा सर्वसामान्य शेतकरी सभासदांचा सवाल आहे …