‘सहकारातील कौरवांचे शकुनी कोण?’
सातारा (महेश पवार) :
कराड येथील कराड जनता बॅंकेचे बोगस कर्ज प्रकरणी जिल्हा उपनिबंधक मनोहर माळीवर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात खळबळ माजली आहे , तर जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेच परंतु सहकार आयुक्त यांच्या कडे माळी यांच्या विरोधात तक्रारी वाढत असल्याने आयुक्त या तक्रारीची दखल घेऊन काय कारवाई करतायत याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
कराड जनता बँकेच्या माध्यमातून सातारा जिल्ह्याच्या सहकारातील प्रशासकीय शकुनी” जो सर्व काळा कारभार करणाऱ्या सहकारातील कौरवांचे पाठीराखे म्हणून उदयास आलेल्या जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांच्याबद्दल किशोर शिंदे यांनी मांडलेली ही कैफियत.
राष्ट्रमतच्या माध्यमातून सहकारातील अनेक प्रकरणे, जीं विकास सेवा सोसायटी असतील, पतसंस्था असो, जिल्हा बँकेशी संबंधित असतील, त्यात जिल्हा सहकार विभागाची भूमिका ही निर्णायक व संशयास्पद राहिली होती, पण कराड जनता बँक प्रकरणात जिल्हा उपनिबंधक यांच्यावरील गुन्ह्याने हे शिक्कामोर्तब झाले की सहकारातील कौरवांचे शकुनी कोण?
निसराळे येथील माजी सैनिकांच्या फसवणुकीत न्याय तर सोडा, त्या कुटुंबाची अवहेलना करण्याचं पाप असो, की जिल्हा बँक नियंत्रित डिस्ट्रिक्ट सुपरव्हिजनच्या सचिव यांनी केलेल्या हजारो कोटींच्या दुबारपीककर्ज वाटप प्रकरणाला दाबण्याचा प्रयत्न असो, जिल्हा उपनिबंधक निर्लज्ज कारभाराचे धनी बनले असून, श्री मनोहर माळी यांना वर्ग करण्यात आलेली सर्व जुनी प्रकरण, जिल्हा बँकेशी निगडित प्रकरण आणी माळी यांनी सुनावणी घेतलेल्या सर्व प्रकरणांची चौकशी केल्यास जिल्हयाच्या नव्हे तर राज्याच्या सहकारात नवीन विक्रम होतील यात शंका नाही.
सातारा जिल्हा बँक आणी जिल्हा उपनिबंधक यांची दुबारपिकंकर्ज घोटाळा प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणा यांच्यामार्फत चौकशी करणार असल्याचे सामाजिक, माहिती अधिकार कार्यकर्ते श्री किशोर शिंदे यांनी राष्ट्रमतला कळवले आहे.