म्हावशीच्या माजी सरपंचाविरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल
सातारा (महेश पवार )
म्हावशी तालुका जावली येथील माजी सरपंच यांनी शासनाला त्यांच्या शेतजमिनी बाबत खोटी माहिती देऊन फसवणूक केल्या संदर्भात कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रदीप रघुनाथ भोसले यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
भोसले यांनी केलेल्या ई-मेल मध्ये नमूद आहे की गाव म्हावशी तालुका जावली जिल्हा सातारा येथे गट क्रमांक 41/1 व 41/2 ला लागून गट क्रमांक 51 असून गट क्रमांक 41/1 व 41/2 येथे रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणास अडथळा निर्माण केला जात आहे, अशी खोटी माहिती देऊन संबंधित व्यक्तींवर कारवाई करावी अशी खोटी तक्रार तहसीलदार मेढा यांच्याकडे करून त्याकरता पोलीस संरक्षण मिळावे आणि संबंधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या ई-मेल मध्ये नमूद आहे की यशवंत रामजी आगुंडे, रखमाजी धोंडीबा भोसले ,नारायण धोंडीबा भोसले ,प्रमोद पांडुरंग आगुंडे,लक्ष्मण धोंडीबा भोसले, शंकर नारायण भोसले, आनंदा नारायण भोसले यांच्यावर फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
येथील गट क्रमांक 51 ही यशवंत रामजी आगुंडे, प्रमोद पांडुरंग आगुंडे,रखमाजी धोंडिबा भोसले, नारायण धोंडिबा भोसले,लक्ष्मण धोंडिबा भोसले, शंकर नारायण भोसले आणि आनंदा नारायण भोसले यांची वडिलोपार्जित मिळकत आहे व सर्वांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे असा उल्लेख दिनांक 13 जून 2022 च्या तहसीलदार मेढा यांना केलेल्या अर्जामध्ये आहे. परंतु गट क्रमांक 51 हा यशवंत रामचंद्र आगुंडे पांडुरंग अंतू आगुंडे,सीताबाई रामचंद्र आगुंडे व संगीता तुकाराम कदम यांच्या नावावर असून बाकी कोणाचेही नाव सातबारावर नाही त्यांचा मुख्य व्यवसाय शेती असे अर्जात नमूद आहे मात्र परिस्थिती वेगळीच आहे.
यशवंत आगुंडे यांनी स्वतःच्या नावाचा केलेला अर्जातील उल्लेख यशवंत रामजी आगुंडे असून त्यांचे खरे नाव यशवंत रामचंद्र आगुंडे असे आहे. यशवंत आगुंडे हे 26-8- 2005 ते 25- 8 -2010 या कालावधीत ग्रुप ग्रामपंचायत कसबे बामणोली येथे सरपंच होते स्थानिक पातळीवर ते उपकंत्राटदाराचे काम करीत असतात नारायण धोंडीबा भोसले व लक्ष्मण धोंडिबा भोसले हे निवृत्त जिल्हा परिषद कर्मचारी आहेत व शंकर नारायण भोसले हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पावशेवाडी येथे शिक्षक म्हणून कार्यरत असून आनंदा नारायण भोसले यांचे तहसीलदार कार्यालय मेढा येथे झेरॉक्स सेंटर आहे.
अशा सुशिक्षित,सुसंस्कृत व्यक्तीकडून शासन आणि शासकीय अधिकारी यांना खोटी माहिती लेखी स्वरूपात देणे किंवा खोटी तक्रार करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. तसेच माझे वडील व चुलते हे रस्त्याच्या कामात अडथळा आणला जात आहे अशी तक्रार अर्जामध्ये नमूद केली आहे. मात्र तसा कोणताही पुरावा आगुंडे यांच्याकडे नाही.
आगुंडे आणि इतर हे माझे वडील व चुलते यांच्या नावे वारंवार खोटी तक्रार देऊन मानसिक खच्चीकरण करत असल्याचा आरोप प्रदीप भोसले यांनी केला आहे. शासनाला खोटी माहिती दिल्या प्रकरणी आगुंडे व त्या इतरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.