google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

अपघातग्रस्त मुलीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज; वडिलांना मिळेना व्हिसा

सातारा (महेश पवार) :

जिल्ह्यातील कराड तालुक्यातील वडगाव उंब्रज  येथील सहयाद्री सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक संजय विठ्ठल कदम यांची भाची नीलम तानाजी शिंदे हिचा अपघात अमेरिकेमध्ये शुक्रवार दि १४ फेब्रुवारी रोजी झाला असून या अपघातामध्ये डोक्याला तसेच दोन्ही हात व पायांन तसेच छातीला गंभीर दुखापत झाली असून तिची प्रकृती गंभीर आहे. या अपघात प्रकरणी एका इसमाला पकडले असून अमेरिकेतील कायद्यानुसार तिच्या रक्तातील व्यक्तीकडून गुन्हा दाखल करण्यासाठी हजर नसल्याने गुन्हा दाखल देखील करण्यात अडचणी येत आहेत.



या अपघातांची कुटुंबियांना रविवार दि १६ फेब्रुवारी रोजी समजली आहे मिळालेल्या माहितीनुसार नीलम हिची परिस्थिती नाजूक असून डोक्याला मार लागल्याने तातडीने शस्त्रक्रिया करावी लागली आहे. याबाबतचा मेल संबधित रुग्णालयाने तातडीने कुटुंबियांना पाठविला असून नजीकच्या सदस्यांना तातडीने अमेरिकेत येण्याची सूचना केली आहे.


अमेरिकेत झालेल्या या अपघातांची माहिती मुलीच्या रुममेट नी तिच्या कुटुंबीयांना दिली , दरम्यान या अपघातांची माहिती मिळताच कुटूंबियांची अमेरिकरत जाण्यासाठी व्हिसा मिळावा याबाबत धावपळ सुरू आहे , परंतु तांत्रिक अडचणीमुळे मुलगी आणि वडिलांची भेट दुरावली असून काही दिवसांपूर्वी नीलम हिच्या आईचेही निधन झाले असल्याने वडिलांची अवस्था बिकट झाली आहे यामुळे केंद्र सरकारने याबाबत मदतीचा हात पुढे करून बाप लेकीची होणारी ताटातूट  होण्यापासून थांबवली पाहिजे , तसेच सर्व प्रकारची वैदयकीय मदत मिळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे…


दरम्यान कुटुंबीयांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ,माजी खासदार श्रीनिवास पाटील,माजी आमदार बाळासाहेब पाटील,याच्या माध्यमातून तात्काळ व्हिसा मिळावा यासाठी पासपोर्ट ऑफिसला जाऊन देखील त्यांच्या पदरी निराशाच आली असून अद्याप सरकारकडून कसल्याही प्रकारची या मुलीच्या कुटुंबीयांना  मदत मिळाली नाही.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!