कास महोत्सव वादाच्या भोवऱ्यात; आमदार शिवेंद्रराजें भोसले यांचा विरोध
सातारा:
साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व पर्यटन विकास महामंडळ यांच्या संकल्पनेने कास पठारावर वनविभाग व जिल्हा माहिती कार्यालय यांनी आयोजित केलेल्या कास महोत्सवास स्थानिकांनी विरोध देखील विरोध केला असून आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी कास पठार आधीच अतिक्रमणाच्या मुद्यामुळे वादाच्या भोवऱ्यात असताना कोणाच्यातरी कार्यकर्त्या साठी शासकीय खर्चाने जर हा कार्यक्रम होत असेल तर आमचा अश्या कार्यक्रमांना विरोध आहे आणि असणार असे मत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
तसेच यासंबंधी आम्ही तक्रार करणार असून या कार्यक्रमासाठी स्थानिक भूमिपुत्रांचा विरोध असून त्यांना विश्वासात देखील घेतलं नसल्याची खंत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.
कास परिसरात होत असलेल्या कास महोत्सवास आरपीआयचे अशोक गायकवाड (बापू) यांनी विरोध केला असून, कास परिसरात होत असलेल्या कास महोत्सवात चला हवा येऊ द्या कार्यक्रम घेऊन कासचे पर्यावरण नेस्तनाबूत करण्याचा नक्की डाव कोणाचा? असा सवाल उपस्थित करत, या कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेल्या जागेवरून तसेच त्या ठिकाणी करण्यात आलेल्या वृक्षतोड आणि सपाटीकरण होतं असताना देखील वन विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात होते ही बाब म्हणजे रक्षकच भक्षक झाल्यासारखे वाटते यामुळे संबंधित वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अशोक गायकवाड यांनी केली.
कारण ज्या पद्धतीने याच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी टेबल लॅन्ड परिसरात घोड्यांच्या पाऊलाचा फुलांना त्रास होऊ लागला म्हणून शेकडो कुटुंबाच्या पोटावर पाय आणला जर कास ला चालतं तर मग पाचगणी का चालत नाही यामुळे संबंधित वन विभागाच्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अशोक गायकवाड यांनी केली.
राष्ट्रमतने कास मोहत्सवाच्या ठिकाणी करण्यात आलेल्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचे नुकसान तसेच परिसरातील जंगली प्राण्यांना होणा-या त्रासाची कैफियत मांडल्यानंतर पर्यावरण प्रेमी तसेच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी देखील होत असलेल्या कार्यक्रमास विरोध दर्शविला आहे .