कासच्या जमिनीचं मार्केट ढासळलं !
सातारा:
साताराच नव्हे तर जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणार्या वर्ल्ड हेरिटेज कास पठाराचं निसर्ग सौंदर्य पर्यटकांचं मुख्य आकर्षण आहे . यामुळे या परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होत असते, यांचा फायदा घेत काही धनिकानी कवडी मोल भावात जमिनी घेतल्या आणि त्या ठिकाणी फार्म हाऊस प्लॉट विक्री केली आणि पैसा कमावला.
खरंतर हा परिसर वर्ल्ड हेरिटेज असल्याने याठिकाणी कोणत्याही प्रकारची बांधकाम परवानगी नसताना देखील, याठिकाणी पाऊला पाऊलावर हॉटेल व्यवसाय उभारली गेली यांवर पर्यावरण प्रेमी नी अनेक तक्रारी केल्यामुळे प्रशासनाने कारवाई चा बडगा उचलला, यामुळे परिसरात घेतलेल्या जमिनीवर कोणत्याही प्रकारची बांधकाम परवानगी मिळत नसल्यामुळे, अनेकांना जमिनी घेऊन फसल्यागत झाल्यानं, याठिकाणी अनेकांनी घेतलेल्या जमिनी कवडी मोल भावात विकण्याची वेळ आली , यामुळे गेल्या काही दिवसांपासून कास परिसरातील जमिनीचं व्यवहार थांबल्याने कास पठारावरील जमिनीचं मार्केट ढासळलं आहे.