वन विभागाच्या नाकावर टिच्चून कास परिसरात वृक्षतोड आणि अवैद्य उत्खनन?
सातारा :
कास पठारावरील सातारा कास रोडवर आटाळी गावच्या हद्दीमध्ये जेसीबीच्या साह्याने झाड मुळासकट उपटून फेकून दिल्याची घटना घडली असून या ठिकाणी उत्खनन करून सपाटीकरण करण्याचे काम सुरू आहे . कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता वनविभागाच्या नाकावर टिचून वृक्षतोड व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने उत्खनन सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
याचं बरोबर वर्ल्ड हेरिटेज असलेल्या कास पठार आणि त्या ठिकाणी होणारी अवैद्य बांधकाम यावर जिल्हा प्रशासनाने आजवर फक्त नोटीसांचा पाऊस पाडला मात्र प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झालीच नाही, यामुळे भविष्यात कास पठार होणार भकास ? असेच काहीसे चित्र दिसत आहे . मात्र कास पठारावर होत असलेली ही बांधकाम आणि वृक्षतोड याकडे पर्यावरण प्रेमींनी देखील याकडे दुर्लक्ष केले? यामुळे कास पठाराचे होणार काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या अनेक दिवसापासून कास पठारावरील अवैद्य बांधकाम आणि वृक्षतोडी संदर्भात अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवला अल्टिमेटम दिली? मात्र पुढे काय झाले याचा ठाव ठिकाणाच लागेना ? यामुळे कास वाचवण्यासाठी पुढाकार घेणारे नेमके कोणत्या कारणामुळे शांत झाले ? असा प्रश्न सातारकरांमध्ये उपस्थित होत आहे.