google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

ज्युनिअर क्लार्कला दिले वाहन निरीक्षक योग्यता प्रमाणपत्र देण्याचे अधिकार?

सातारा (महेश पवार) :


सातारा परिवहन कार्यालयातील तत्कालीन ज्युनिअर क्लार्क श्रीनिवास विलास घोडके यांना अधिकार नसताना देखील ५६ वाहनांचे बेकायदेशीर रित्या फिटनेस देण्यासाठी घोडके यांना संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कशी परवानगी दिली व का दिली ?हा या निमित्ताने प्रश्न उपस्थित होत आहे . संबंधित अधिकाऱ्याने ज्युनिअर क्लार्क यांना आर्थिक देवाण-घेवाण करण्यासाठी संगनमताने बेकायदेशीर पणे आपले अधिकार दिल्याची चर्चा सध्या सुरू आहे.


दरम्यान काही दिवसांपूर्वी सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वायरल झालेल्या त्या व्हिडिओ ने खाबुगिरी समोर आली , आणि परिवहन कार्यालयातील बेकायदेशीर एजंटच्या माध्यमातून होणारी कामे ही पैसे देऊन केली जात असल्याचे चित्र समोर आले , मात्र या वायरल झालेल्या व्हिडिओ बाबतीत परिवहन विभागाने मौन नेमकं का बाळगले असा सवाल उपस्थित होत आहे . यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील खाबुगिरी ने परिवहन विभागाच्या कार्यालयातील चव्हाट्यावर आलेल्या कारभाराची चौकशी होणार का ? आणि संबंधितांवर कारवाई होणार का ? मात्र हे प्रकार सुरू असताना देखील प्रशासन गंधारीच्या भूमिकेत का ? यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील या खाबुगिरीवर जिल्हा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी खुलासा करणार का ?

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!