आरटीओ ट्रॅक उठला नागरिकांच्या जीवावर?
सातारा (महेश पवार) :
सातारा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील आरटीओ चा ट्रॅक नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याठिकाणी कार्यालयात मुदत संपलेल्या वाहनांची तपासणी करून त्याचा फिटनेस बघितला जातो म्हणजेच त्या वाहणाची टेस्ट घेतली जाते. यामध्ये संबंधित वाहनांची ड्राईव्ह करुन त्या वाहनांचा ब्रेक टेस्ट आणि क्लज टेस्ट होते . ज्यावेळी ही टेस्ट घेतली जाते त्या दरम्यान त्या वाहनांचा ब्रेक टेस्ट ज्या ठिकाणी केला जातो त्या ठिकाणांपासून अवघ्या शंभर फुटांवर आरटीओ कार्यालयाचा मुख्य रस्ता असून याच चौकात दवाखाना कॉलेज तसेच अन्य शासकीय कार्यालय असल्याने मोठ्या प्रमाणावर कामासाठी लोकांची रहदारी असते , अशा वेळी ब्रेक टेस्ट करते वेळी एखाद्या वाहनांचा ताबा किंवा ब्रेक फेल झाला तर या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांच्या तसेच कॉलेज विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला तर त्यास जबाबदार कोण असा सवाल सर्वसामान्य सातारकरांना पडला आहे.
सातारा शहरात असलेल्या या आरटीओच्या ट्रॅक बाबत शहराच्या बाहेर नेण्याचं ठरलं असताना देखील नेमकं घोडं अडलं कुठं उपस्थित होत आहे.
सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात असणाऱ्या ट्रॅकवर वाहन तपासणी करत असताना वारंवार किरकोळ अपघात होत असतात, काही दिवसांपूर्वी एका अधिकाऱ्याचा अपघात होऊन त्याला गंभीर दुखापत होऊन सुद्धा सातारा उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नागरिकांच्या जीवाला धोका होईल असा ट्रॅक ठेवण्यामागचं नेमकं गौडबंगाल काय असा सर्वसामान्य नागरिकांमध्ये यक्षप्रश्न निर्माण होत आहे.