मुलांमधील स्कोलिओसिस : लवकर निदान आणि उपचारांचे पर्याय
– डॉ. सन्नी कामत, (कन्सल्टंट – स्पाईन ऑर्थोपेडिक्स सर्जरी, मणिपाल हॉस्पिटल गोवा)
इडियोपॅथिक स्कोलिओसिस हा स्कोलिओसिसचा सर्वसाधारण प्रकार असून याची व्याख्या म्हणजे पाठीच्या मणक्या मध्ये व्यंग निर्माण होऊन तो एका बाजूला कलतो आणि त्यामुळे पाठीला कुबड येते, याचे कारण अजूनही सापडलेले नाही. इडिओपॅथिक स्कोलिओसिस चे अचूक कारण सापडलेले नसले तरीही यावर संशोधन सुरु आहे, या मागील महत्त्वाची काही कारणे म्हणजे जनुकीय घटक, न्युरोमस्क्युलर घटक, हॉर्मोन्स मधील असमतोल किंवा हाडांच्या वाढीमध्ये समस्या निर्माण होणे ही आहेत.
स्कॉलिओसिसचे लवकर निदान करणे खूपच आवश्यक असते कारण यामुळे भविष्यातील समस्या टाळता येऊ शकतात. मुलांमध्ये अनेक शारीरीक लक्षणे किंवा कॉस्मेटिक बदल घडू लागतात किंवा यातील काहीही होत नसते. काही रुग्णांमध्ये सोलिऑसिस चे दृष्यमान लक्षणे दिसू शकतात. अन्य मुलांमध्ये पाठीला अधिक कुबड येण्या बरोबरच पाठदुखीही जाणवू लागते. कोणतेही काम केल्यानंतर दुखणे अधिक प्रमाणात वाढू लागते. सर्वसमोवशक इतिहासाचा अभ्यास केल्यास आणि शरीराची तपासणी यावेळी करणे आवश्यक असते, यामध्ये मुलाच्या परिवाराचा इतिहास, जन्माशी संबंधित वैयक्तिक गोष्टी आणि सर्जिकल तसेच औषधांचा इतिहास आणि न्युरोलॉजिकल तपासणी करावी लागते.
साधारण तपासणी मध्ये सरळ रेशेतील ॲन्टेरियर आणि बाजूला झुकलेल्या स्कॉलिओसिस चा रेडिओग्राफ यांचा समावेश आहे. त्याच बरोबर टोटल स्कॅन एमआरआय करणेही आवश्यक असते.
उपचारांचे पुढील पर्याय उपलब्ध आहेत :
१). ब्रेसिंग
ब्रेसिंग ही रुग्ण, पालक आणि फिजिशियन्स साठी सुध्दा एक आव्हानात्मक स्थिती असते. ब्रेसिंगचा सल्ला विशेषकरुन हाडांची पूर्ण वाढ झालेली नसेल अशा रुग्णांना ज्यांच्यातील पोक हे २५ ते ४० ते ४५ अंशात असते अशांना देण्यात येतो. ब्रेसिंगचा प्रमुख उद्देश हा स्कॉलिओसिस बरा करणे हा नसतो किंवा जोर लावून लवचिक आणि चुकीच्या आकारातील हाडांना सरळ करण्यासाठी असतो.
२). सर्जरी
एआयएस मधील दोष सुधारण्याचा प्रमुख सिद्धांत म्हणजे न्यूरोलॉजिकल कमतरता न करता हाडांना आलेले पोक कमी करणे आणि पोक अधिक वाढू नये यासाठी प्रयत्न करणे. स्कोलियोसिस सुधारण्यासाठी स्क्रू, रॉड आणि फ्यूजनसह पोस्टरियर स्पाइनल इन्स्ट्रुमेंटेशन ही सर्वात सामान्यपणे केली जाणारी प्रक्रिया आहे. समतोल राखून, सरळ पाठीचा कणा मिळवताना रुग्णाला शक्य तितक्या मोबाइल, व्हर्टेब्रल सेग्मेंट्स जोडणे हे शस्त्रक्रियेचे ध्येय आहे. पोस्टरियर पेडिकल स्क्रू कंस्ट्रक्ट हे स्कोलियोसिस वर्गीकरणासाठी न्यूरोलॉजिकलदृष्ट्या सुरक्षित उपचार आहेत आणि सुधारित फुफ्फुसाचे काम आणि क्लिनिकल परिणामांसह पाठीच्या कण्याला आलेले पोक लक्षणीय प्रमाणात सरळ करता येते.