google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘…हृदयात प्रेम ज्याच्या त्यालाच हिंदूत्व ठावे’


पणजी :

“शाखेत शिक्षण ज्याचे त्याला कसे कळावे ? हृदयात प्रेम ज्याच्या त्यालाच हिंदूत्व ठावे” हिंदू धर्म हि एक जीवनशैली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतानी योग्य पुस्तके वाचून हिंदू धर्म समजून घेण्याचे शिक्षण घ्यावे. स्वयंघोषीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राजकीय पंडितांकडून हिंदू धर्म त्यांना कदापी कळणार नाही असा जबरदस्त टोला कॉंग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी हाणला आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतानी काल इंडिया गटबंधनावर केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना, अमरनाथ पणजीकर यांनी भाजपने कितिही धडपड केली तरी “जुडेगा भारत जितेगा इंडिया” हेच सत्य असल्याचे म्हटले आहे.


हिंदू धर्म ही कोणत्याही एका राजकीय पक्षाची, नेत्याची जहागीर अथवा खाजगी मालमत्ता नाही. हिंदू हा सनातन धर्म आहे जो आम्हीही आमच्या खाजगी जीवनात तितक्याच तन्मयतेने पाळतो. आमच्याही दैनंदिन जीवनात देव, धर्म व्रतवैकल्ये आहेत हे मुख्यमंत्र्यांनी समजून घ्यावे असा दावा अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.


सरकारी खर्चाने कोणत्यातरी मंदिरात जाऊन पूजा पाठ करणे हे देवालाही आवडणारे नाही. त्यामुळे राज्याच्या संविधानात्मक पदावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी जबाबदार पद्धतीने बोलले पाहिजे. इंडिया ही आघाडी आहे. तो राजकीय पक्ष नाही. आणि इंडिया या आघाडीतील बहुतांश नेते, कार्यकर्ते हिंदू धर्मातील असून धर्म रक्षणात त्यांचाही मोठा वाटा आहे. केवळ सणसणाती निर्माण करण्याच्या हेतूने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतानी बालीश वक्तव्य करुन आपलेच हसे करुन घेतले असे अमरनाथ पणजीकर यांनी म्हटले आहे.


गोव्यातील हिंदूचा सर्वात मोठा सण आठवड्यावर येवून टेकला आहे. गोव्यातील गरीब व गरजवंत जनता समाजकल्याण खात्याच्या अर्थसहाय्याच्या प्रतिक्षेत आहे. ३२० कोटीची थकबाकी सरकारने आता तरी लोकांना द्यावी. हिंदू धर्म म्हणजे केवळ पोकळ आश्वासने देणे नसून, अडलेल्या नडलेल्यांना मदतीचा हात देणे हिच हिंदू धर्माची शिकवण आहे हे मुख्यमंत्र्यानी ध्यानात ठेवावे असे अमरनाथ पणजीकर यांनी म्हटले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!