
कोंडवे गोळीबार प्रकरणातील संशयिताचे घर पेटवण्याचा प्रयत्न….
सातारा (महेश पवार) :
शहरानजीक असलेल्या जकात वाडी येथे राहणाऱ्या आणि कोंडवे परिसरात झालेल्या फायरिंग प्रकरणातील संशयित आरोपी धीरज शेळके यांच्या घरावर अज्ञातांकडून पेट्रोलची बाटली टाकून घर पेटवण्याचा प्रयत्न झाला , दरम्यान परिसरातील जागरूक नागरिकांनी लागलेली आग विझवली मात्र आग लावणारे पळून गेले.
मात्र या घटनेनंतर पुन्हा एकदा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . दोन दिवसापूर्वीच जकातवाडी परिसरामध्ये दोन गटात झालेल्या राड्याची घटना ताजी असतानाच घर पेटवण्याची घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ,विशेष बाब म्हणजे दोन दिवसापूर्वी झालेल्या राड्यानंतर या परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता मात्र तरीही शुक्रवारी अज्ञाताकडून घर पेटवण्याचा प्रयत्न झाला यामुळे बंदोबस्तासाठी असलेले पोलीस नेमकं काय करतं होते असा सवाल उपस्थित होत आहे.