
स्वातंत्र्य दिनानिमित्त टाटा टी प्रीमियम कडून ‘देश का गर्व’ मोहिम
मुंबई: ‘टाटा टी प्रीमियम’ आपल्या ‘देश का गर्व’ मोहिमेच्या २०२५ आवृत्तीच्या माध्यमातून भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाला मान देण्याची परंपरा यापुढेही सुरू ठेवत आहे. दरवर्षी स्वातंत्र्यदिन साजरा करताना ‘टाटा टी प्रीमियम’ तर्फे चहाच्या दैनंदिन संस्कृतीला स्थानिक कलांशी जोडण्यात येते. त्यानुसार यंदा भारतातील प्रतिष्ठित कलाप्रकारांपासून प्रेरणा घेत तयार केलेल्या हस्तचित्रित किटलींच्या ‘देश का गर्व’ संग्रहामार्फत हा उपक्रम राबवला जात आहे.
‘टाटा टी प्रीमियम’ ने चहा संस्कृतीचा भाग असलेल्या वस्तूंमधून, मग तो साधा कुल्हड असो, चहाचा पारंपरिक कप असो किंवा यावर्षीची प्रातिनिधीक किटली, भारताची समृद्ध लोककला आणि प्रादेशिक कला सतत प्रकाशझोतात आणल्या आहेत. यातील प्रत्येक आवृत्ती केवळ सौंदर्यापुरती मर्यादित नसून, भारताच्या कलात्मक वारशाचे जतन, संवर्धन आणि पुढील पिढ्यांपर्यंत आधुनिकतेच्या आणि सार्थकतेच्या माध्यमातून पोहोचवणे हा उद्देश त्या मागे असतो. भारताच्या हस्तकलेचे सौंदर्य सगळे जग नव्याने शोधू लागले असताना, ‘टाटा टी प्रीमियम देश की चाय’ हा ब्रॅंड मात्र हे सौंदर्य आपल्या दैनंदिन जीवनात पूर्वीपासूनच साजरे करत आला आहे. यावर्षी भारतीय लोककलेच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या ‘कौशलम’ संस्थेच्या सहयोगाने ‘देश का गर्व’ संग्रहात प्रादेशिक कलाप्रकारांपासून प्रेरणा घेतलेल्या हस्तचित्रित किटल्या सादर करण्यात आल्या आहेत.
या वर्षी ‘टाटा टी प्रीमियम’ ने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक म्हणून वारली कला सादर केली आहे. ही कला सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेली एक आदिवासी चित्रशैली आहे. काळ्या-पांढऱ्या रेषांमधून उभी राहणारी, लयबद्ध शैलीत गोष्टी सांगणारी ही कला लावणीची नर्तिका, शनिवार वाडा, ढोल-ताशा आणि मोर यांसारख्या पारंपरिक प्रतीकांतून साकारली गेली आहे. पारंपरिक वारली शैलीत चित्रित केलेली ही मर्यादित आवृत्तीतील किटली, महाराष्ट्राच्या आदिवासी परंपरेला अर्पण केलेली एक जिवंत कलाकृती ठरते.
पुनीत दास, पॅकेज्ड बेव्हरेजेस (भारत आणि दक्षिण आशिया) विभागाचे प्रमुख, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स म्हणाले,“टाटा टी प्रीमियम’ मध्ये आमची स्थानिकतेवर आधारित धोरणे ही भारताच्या वैविध्यपूर्णतेवर आधारित आहेत आणि हे वैविध्यच आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद आहे. ‘देश का गर्व-प्रदेश की कला’ या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही केवळ कलेचा गौरव करत नाही, तर भारताच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करत आहोत. चहाच्या प्रत्येक किटलीतून एक अभिमानाची गोष्ट आम्ही उभी करीत आहोत, जी आता ग्राहकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग ठरणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम केवळ स्वातंत्र्य दिनापुरता न ठेवता, दररोजच्या आयुष्यातही भारतीय संस्कृतीचा उत्सव साजरा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामध्ये आम्ही कला आणि तंत्रज्ञानाची ताकद वापरतो आणि त्याद्वारे काळ, स्थळ आणि पिढ्यांच्या मर्यादा पार करत, दृश्यात्मक आणि प्रभावी कथन सादर करतो. यंदाच्या आवृत्तीत, ‘एआय’च्या सामर्थ्याचा उपयोग करून भारतीय कला जिवंत केली आहे आणि ती स्वातंत्र्य दिनाच्या गौरवास शोभेल अशीच झाली आहे.”
मृणालिका जैन भारद्वाज, संस्थापक, कौशलम संस्था यांनी सांगितले,“ही भागीदारी म्हणजे लोककलांना एक नवे माध्यम देण्याचा प्रयत्न आहे. परंपरा केवळ संग्रहालयात जपली जात नाही, तर ती रोजच्या आयुष्यातही जगली जाते, असे ‘कौशलम’मध्ये आम्ही मानतो. या किटल्या केवळ उपयोगी वस्तू नाहीत, तर त्या संस्कृतीचे कथन करणाऱ्या जिवंत कॅनव्हास आहेत. टाटा टी प्रीमियमसारख्या भारतातील एक प्रतिष्ठित ब्रँडशी नाते जोडले गेल्याचा आम्हाला अभिमान वाटतो.”
‘देश का गर्व’ संग्रह खास www.IndiakiChai.com या संकेतस्थळावर विक्रीसाठी उपलब्ध असेल. या विक्रीतून मिळणारे उत्पन्न भारतीय लष्कराच्या कौशल्यविकास केंद्रांद्वारे महिलांच्या प्रशिक्षण व सक्षमीकरणासाठी शंभर टक्के वापरण्यात येणार आहे.