गोवा मुक्ती दिनानिमित्त केंद्राचे गोव्याला गिफ्ट…
वास्को:
भारतीय नौदल आणि गोवा राज्य यांच्यातील संबंधांना अधिक बळकटी देणारी सागरी युद्धनौका ‘आयएनएस मुरगाव’ लोकार्पणासाठी सज्ज झाली आहे. गोवा मुक्तीदिन तसेच ऑपरेशन विजयच्या 61 व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर हे लोकार्पण होणार आहे. ते मुंबई येथील संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते पार पडणार आहे. या युद्धनौकेचे नामकरण पश्चिम किनाऱ्यावरील मुरगाव शहराच्या नावावरून करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ‘मुरगाव’ बंदराच्या नावाने तयार झालेली सर्वात प्राणघातक युद्धनौका ‘आयएनएस मुरमुगाव’ संपुर्णपणे कार्यक्षम झाली आहे. जेव्हा गोव्याने पोर्तुगीज राजवटीपासून मुक्त्तीची 60 वर्षे साजरी केली, तेव्हा मुरगावने 19 डिसेंबर 21 रोजी पहिली सागरी मोहीम हाती घेतली, या पार्श्वमीवर 18 डिसेंबर 2022 रोजी गोवामुक्ती दिनाच्या पूर्वसंध्येला तिचे जलावतरण होणार आहे.
‘आयएनएस मुरमुगाव’ची 163 मीटर लांबी, 17 मीटर रुंदी आहे. भारतीय नौदलाच्या, वॉरशिप डिझाईन ब्युरोने ‘आयएनएस मुरमुगाव’ या स्वदेशी जहाजाची रचना केली असून मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने बांधणी केली आहे. तसेच ती सर्वात शक्तिशाली युद्धनौकांपैकी एक म्हणून ही ओळखली जाते.
“ऑपरेशन विजयच्या प्रारंभाच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त, 18 डिसेंबर रोजी आयएनएस मुरगावचे लोकार्पण हे गोवा स्वतंत्र झाला आणि भारतातील वसाहतवाद संपुष्टात आणला, या त्रिवेणी सेवा ऑपरेशनच्या ऐतिहासिक महत्त्वात आणखी भर पडली आहे. गोव्याला समृद्ध इतिहास आणि वारसा आहे.
नौदलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, एखाद्या शहराला युद्धपुरुषाचे नाव देणे ही शतकानुशतके जुनी नॉटिकल परंपरा आहे. आणि म्हणूनच या जहाजाचे नाव गोवा राज्यातील मुरगाव या ऐतिहासिक बंदर शहरावरून पडले आहे. मुरमुगाव – त्याच्या भौगोलिक स्थितीनुसार आणि द्वीपकल्पीय भारतातील सर्वात वरदान असलेल्या नैसर्गिक बंदरांपैकी एक आहे. असं ही ते म्हणाले.