google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

‘IPLचे तुम्हीच मालक’ असे फडणवीस का म्हणाले उदयनराजेंना ?

सातारा (महेश पवार) :

जिल्हा दौऱ्यावर आलेल्या देवेंद्र फडणवीस व उदयनराजे यांच्यात राजकीय तु तु मैं मैं पहायला मिळाली. शिवाजी स्टेडियमवर झालेल्या कार्यक्रमात उदयनराजें आपल्या खास शैलीत म्हणाले रनजी मॅच चे कॅप्टन तुम्ही व्हा, फक्त तुमच्या टिममध्ये आम्हाला घ्या आम्हाला रिझर्व्ह ठेवू नका कोणाला घ्यायचे आणि कोणाला रिझर्व्ह ठेवायचं म्हणत उदयनराजेंनी फडणवीस यांना चिमटा काढत अप्रत्यक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत आम्हाला तुमच्या टिम मध्ये घ्या म्हणत तिकिटांची मागणी केली.




यावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील उदयनराजेंना ही रनजी मॅच नसुन IPL आहे आणी तुम्हीच मालक आहेत म्हणत उदयनराजेंनी लोकसभेसाठी टाकलेला चेंडू फडणवीसांनी उदयनराजेकडे टोलवला.

उदयनराजेंनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या राजकीय टोलेबाजीमुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात उदयनराजेंना लोकसभेला उमेदवारी मिळणार की त्यांना बाहेर बसवले जाणार यांची राजकीय वर्तुळात चर्चा रंगु लागल्याने आगामी लोकसभेच्या निवडणुकीत तिकीट कोणाला मिळणार, याकडे जिल्हा वासियाचे लक्ष लागून राहिले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!