‘मिशांवर ताव देण्यापेक्षा, आलिंगन देणे केव्हाही चांगले’
उदयनराजे भोसले यांची शिवेंद्रसिंहराजेवर सणसणीत टीका
सातारा (महेश पवार) :
ज्यांना जनतेने नगरपरिषदेसाठी रिटायर केले आहे त्यांनी सातारा विकास आघाडीने रिटायरमेंट घ्यावी असा सल्ला देणे म्हणजे चोंबडेपणा आहे . आमदारांचा रियल इस्टेटचा धंदा कमी झाला असल्यास त्यांनी चोंबडे सल्ले देण्याचा नवीन व्यवसाय सुरू करावा असे जोरदार प्रत्युत्तर खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिले आहे
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नुकतीच सातारा विकास आघाडीने रिटायरमेंट घ्यावी असे वक्तव्य केले होते या वक्तव्याचा उदयनराजे यांनी पत्रकातून जोरदार समाचार घेतला आहे पत्रकात पुढे नमूद आहे की, आमदारांनी चोंबडे सल्ले देण्याचा नवीन धंदा निश्चित सुरू करावा ज्यांना जनतेने आधीच नगरपालिकेतून रिटायर केले आहे त्यांनी असले सल्ले देऊ नयेत . प्रशासकीय राजवट पालिकेत लागून एक वर्ष होत आहे . नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्याकरता सातारा विकास आघाडी काहीच करत नाही अशी बोंब मारणारेच ज्यावेळी कास जलपूजन केले त्यावेळी सातारा विकास आघाडीचा काय संबंध अशी गरळ ओकत होते . प्रशासकीय राजवटीमध्ये नागरिकांची कामे होत नाहीत असे त्यांचे अप्रत्यक्ष म्हणणे म्हणजे नथीतून तीर मारण्याचा प्रकार आहे दोन्ही डगरीवर हात ठेवणारे आमदार सैरभैर झाले आहेत . जनतेतून थारा मिळणार नाही याची भीती वाटत असल्याने कोणत्याही ठिकाणी आमच्यावर शब्द फेक केल्याशिवाय यांना राहवतच नाही
कुरतडलेली दाढी आणि भुरकट मिशांवर ताव देण्यापेक्षा कोणाला आलिंगन देणे केव्हाही चांगले यांच्यासारखे पोटात एक आणि ओठात एक असे आमचे तरी नाही असा पलटवर उदयनराजे यांनी केला आहे निष्ठा दाखवायला लागत नाही तर ते आपोआप प्रदर्शित होते आपण भाजपमध्ये असताना सुमारे अडीच वर्ष कोणाची टीमकी वाजवली हे जनतेला माहित आहे .आता तुमची निष्ठेची नाटके सुरू झाली आहेत असा टोलाही उदयनराजेने लगावला आम्ही भाजपमध्ये जाणार याची कुणकुण लागताच यांनी भाजपला जवळ केले त्यामुळेच आम्ही भाजपाने जाण्याचा निर्णय लांबवला ते भाजपात गेले म्हणून नंतर आम्ही गेलो हा अर्थ काढत असतील तर ते चुकीचे आहे कोणी कोणत्या पक्षात जावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे .
प्रसिद्ध दादांनी देखील भाजप बरोबर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली हे भाजपात गेले म्हणून सर्व घडले असे देखील आता बडबडतील त्यांच्या बडबडीला आमच्या लेखी आणि जनतेच्या लेखी काडी मात्र किंमत नाही आम्ही हत्तीच्या चालीने चाललो आहोत त्यामुळे इतरांच्या भुंकण्याकडे आम्ही लक्ष देत नाही पेन्शनर सिटी चे स्मार्ट सिटीत रूपांतर करण्यासाठी सातारा विकास आघाडी वचनबद्ध आहे आणि नागरिकांची साथ कोणाला मिळेल हे येणारा काळच ठरवेल असा टोला उदयनराजे यांनी लगावला आहे