YouTube वर ट्रेण्ड होतोय विक्रम वेधचा टीझर…
मुंबई:
हृतिक रोशन आणि सैफ अली खान अभिनित विक्रम वेधाचा बहुप्रतिक्षित टीझर नुकताच प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून प्रेक्षक एका पोलीस आणि गुंडाच्या या वेधक कथेचा प्रवास कसा होतो हे पाहण्यासाठी उत्सुक आहेत. या टीझरने चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली असून, २४ तासांत सर्वाधिक आवडलेला टीझर बनला आहे. हृतिक रोशनचे स्टारडम आणि पुष्कर आणि गायत्रीची विश्वासार्हता लक्षात घेता, टीझर लॉन्च झाल्यापासून अवघ्या 10 तासांत असा बेंचमार्क गाठणे हे चित्रपटासाठी जरा देखील आश्चर्यकारक नाही.
चित्रपटाच्या टीझरला YouTube वर 9.4 लाख लाईक्स मिळाले आहेत आणि सर्व प्लॅटफॉर्मवर 22.4 दशलक्ष+ व्ह्यूज मिळाले आहेत. विक्रम वेधाचा टीझर यूट्यूबवर नंबर 1 वर ट्रेंड करत आहे आणि त्याचा #VikramVedhaTeaser हॅशटॅग जगभरात ट्रेंड करत आहे आणि भारतात ट्विटरवर आपले नंबर 1 स्थान घट्टपणे राखून आहे. हृतिक रोशनच्या अनोख्या व्यक्तिरेखेबद्दल चाहते चर्चा करत असतात आणि त्याला गँगस्टरची भूमिका करताना पाहून त्यांना धक्का बसला आहे. तर सैफ अली खानच्या प्रामाणिक पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेला सर्व बाजूंनी प्रेम मिळत आहे.
फ्रायडे फिल्मवर्क्स आणि YNOT स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने गुलशन कुमार, टी-सिरीज फिल्म्स आणि रिलायन्स एंटरटेनमेंट यांनी ‘विक्रम वेधा’ सादर केला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी केले असून एस शशिकांत आणि भूषण कुमार यांची निर्मिती आहे. हा चित्रपट 30 सप्टेंबर 2022 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.