जगभरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत…
31 डिसेंबरच्या रात्री घडाळ्याच्या काट्याने बाराचा आकडा गाठल्याबरोबर देशभरात नव्या वर्षाचे स्वागत करण्यात आलं.
जल्लोषात, फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये भारतीयांनी नवीन वर्षाचे स्वागत केले. जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी आणि महाराष्ट्र ते पश्चिम बंगाल संपूर्ण देशभरात नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटनस्थळावर गर्दी झाली आहे. त्याशिवाय अनेक जणांनी मंदिरात जाऊन 2022 वर्षाला निरोप दिला अन् नव्या वर्षासाठी नवा संकल्प केलाय.
मुंबईमध्येही नवीन वर्षाचं दणक्यात स्वागत करण्यात आलं. नवी मुंबई महापालिकेला विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
2022 ला निरोप देण्यासाठी आणि 2023 च्या स्वागतासाठी अनेकांनी पर्यटनस्थळाला हजेरी लावली. लोणावळा, खंडाळा, माथेरान, कोकण, गोवा, मनाली, हिमाचलप्रदेश, जम्मू काश्मीर यासह विविध पर्यटन स्थळावर गर्दी उसळली होती. तीन वर्षानंतर कोरोनाचा जोर ओसरला आहे, त्यामुळे नागरिक नव्या वर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडले आहेत.
गोव्यात नव्या वर्षाचा जल्लोषात स्वागत पाहायला मिळालं. 2023 च्या स्वागतासाठी गोव्यात लाखो पर्यटक पोहोचले. क्लब, पब आणि नाइट पार्ट्यांमध्ये मोठ्या संख्येने गर्दी झाली. लोकांनी आपापल्या पद्धतीने नव्या वर्षाचे स्वागत केले.
न्यूझीलंडमधील ऑकलंडच्या स्काय टॉवरवर दरवर्षीप्रमाणे यंदाही नयनरम्य रोषणाई केली होती. या परिसरात जमलेल्या नागरिकांनी 2022 ला निरोप देत 2023 चं मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केलं. स्काय टॉवरवर लावलेल्या भल्यामोठ्या घड्याळामध्ये 12 वाजताच जोरदार आतषबाजी आणि सेलिब्रेशन सुरु झालं.
ऑस्ट्रेलियाची राजधानी सिडनीमध्ये नववर्षाचं जोरदार स्वागत करण्यात आलं. सुप्रसिद्ध सिडनी हार्बर ब्रिजवर यावेळी मोठी गर्दी जमली होती.